आनंद निकेतन महाविद्यालय,आनंदवन,वरोरा येथे ” पालक-शिक्षक संघ सर्वसाधारण सभा संपन्न “
आनंद निकेतन महाविद्यालय,आनंदवन,वरोरा येथे ” पालक-शिक्षक संघ सर्वसाधारण सभा संपन्न “
तालुका प्रतिनिधी:ग्यानीवंत गेडाम वरोरा
आनंद निकेतन महाविद्यालयात दिनांक 11 ऑक्टोबर 2022 मंगळवार ला पालक शिक्षक संघाची सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात संपन्न झाली .या कार्यक्रमाला अध्यक्ष प्रभारी प्राचार्य प्रा.डॉ.अरविंद सवाने तर उपाध्यक्ष उपप्राचार्य प्रा.सौ.राधा सवाने, प्रमुख उपस्थिती पर्यवेक्षक प्रा.उषा गालकर प्रा.सीमा नगरारे,प्रा.डॉ. मानसी काळे यांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. स्वागत गीत कु.कल्याणी पाटील व कु. श्रावणी वरुटकर यांनी सादर केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. अनिल तरोळे यांनी करताना सांगितले की,कोरोना काळानंतर विद्यार्थ्यांची मानसिकता याबाबत विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्याबाबत पालक व शिक्षकांनी समन्वयाने चर्चा करावी असे आवाहन केले तसेच सुजाण पालकत्व स्वीकारून पाल्यांना मार्गदर्शन करावे. पर्यवेक्षक प्रा. उषा गालकर मॅडम यांनी पालक शिक्षक सभेमध्ये पालकांची भूमिका काय असावी याबाबत मार्गदर्शन केले.त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना घडवण्याचे कार्य पालक व शिक्षक या दोघांचेही आहे.यासाठी पालकांनी शिक्षकांच्या नेहमी संपर्कात राहावे असेही सांगितले. मागील सत्रातील पालक शिक्षक संघाचे माजी सचिव प्रा. विश्वजीत गजरे, यांनी अहवाल वाचन केले.
या कार्यक्रमांमध्ये पालक प्रतिनिधी राजेंद्र मारोतराव फुलझेले, अर्चना सुरेश भोयर यांचे स्वागत करण्यात आले . कार्यक्रमाला उपस्थित पालक व शिक्षक वर्गातून शौकत शहा, दिवाकर टापरे, सुरेखा लभाने, शितल सिद्धार्थ आमटे, विलास टोंगे, मंजुषा कोसरे प्रा. लता आत्राम यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
” कोविड नंतर विद्यार्थ्यांची अवस्था ” या विषयावर उपप्राचार्य प्रा.राधा सवाने यांनी उपस्थित पालकांना आपल्या पाल्यांबाबत सतत माहिती घ्यावी त्यांच्या प्रगती विषयक माहिती जाणून घ्यावी आणि शिक्षकांच्या संपर्कात राहून विद्यार्थ्यांचा विकास कसा करता येईल याची चर्चा करावी, कमवा आणि शिका याचाच मूलमंत्र दिलं तसेच मोबाईलचे दुष्परिणाम, वाईट व्यसन, यापासून विद्यार्थ्याने दूर राहावे आणि अभ्यासात लक्ष केंद्रित करावे असे आवाहन केले. अध्यक्षीय भाषणामध्ये प्रा.डॉ.अरविंद सवाने (प्रभारी प्राचार्य)यांनी पालक शिक्षक संघाची गरज याच वयातील विद्यार्थ्यांकरिता खूप आवश्यक आहे असे प्रतिपादन करून विद्यार्थ्यांचे मार्क्स जेवढे महत्त्वाचे आहेत त्याहीपेक्षा त्यांना मानसिक आधार देऊन त्यांचा सर्वांगीण विकास कसा करता येईल यासाठी पालक शिक्षक संघाची गरज व्यक्त केली. जीवनात यशस्वी होण्याचा मूलमंत्र दिला, तसेच पालक-शिक्षक संघाचे महत्त्व पटवून दिले.
कार्यक्रमाचे यशस्वी संचालन प्रा. सीमा नगरारे, यांनी केले.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा . एम. एम.मुंडे यांनी मानले तर कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली. या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात पालक उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजन समिती व शिक्षक वृंद, कर्मचारी वृंद यांचे हातभार लागले.