ताज्या घडामोडी

अखिल भारतीय ग्राहक पंचायतचा चंद्रपूर जिल्हा ग्राहक मेळावा व मार्गदर्शन शिबिर संपन्न

मुख्य संपादक:कु.समिधा भैसारे

चिमूर नजीकच्या नेरी येथील वाय. एस.पवार महाविद्यालयात नुकताच अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे मार्गदर्शन शिबिर पार पडले. अध्यक्षस्थानी डॉ. श्यामजी हटवादे उपस्थित होते. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉक्टर नारायणजी मेहरे (अध्यक्ष अखिल भारतीय ग्राहक पंचायत विदर्भ प्रांत), नितीनजी काकडे (सचिव अखिल भारतीय ग्राहक पंचायत विदर्भ प्रांत), नंदिनी चुणारकर( अध्यक्ष अखिल भारतीय ग्राहक पंचायत चंद्रपूर जिल्हा), वसंत वराटे (संघटक अखिल भारतीय ग्राहक पंचायत चंद्रपूर जिल्हा), प्रवीण चिमूरकर (सदस्य जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद चंद्रपूर), वैद्य सर (प्राचार्य वाय. एस. पवार महाविद्यालय नेरी) आदींची उपस्थिती होती.

दीप प्रज्वलनाणे शिबिराला सुरुवात झाली. भारतीय उद्योग जगताचे मुकुटमणी रतन टाटाच्या निधना निमित्ताने सर्वप्रथम त्यांच्या मृत आत्म्यास श्रद्धांजली वाहून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. प्रसंगी वसंत वरहाटे,प्रवीण चिमूरकर, नंदिनी चुनारकर, नितीनजी काकडे आदींनी उपस्थित विद्यार्थ्यांना व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. डॉक्टर नारायणजी मेहेरे यांनी याप्रसंगी अनेक दाखले देत ग्राहक पंचायतच्या कार्याची उकल केली. आपण ग्राहक म्हणून कसे फसविले जातो ? यावर उपाय? सतर्कता ?ज्ञान आदींची माहिती आपल्या मनमोहक वाणीतून दिली. ग्राहकांची कर्तव्य आदीवर बरेच मार्गदर्शन केले .तक्रार कुठे करायची? कशी करायची? अन्याय झाल्यावर त्याची निवारण कसे करायचे? हे मार्गदर्शनातून सांगितले. अध्यक्ष मनोगता दरम्यान डॉक्टर श्यामजी हटवादे यांनी ग्राहक पंचायतच्या सखोल कार्याबद्दल माहिती दिली. त्यांनी एक ग्राहक म्हणून मी स्वतः सुद्धा कसा फसविला गेलो होतो याबाबत माहिती दिली. ग्राहक पंचायत ग्राहकांच्या हितासाठी झटणारी संघटना कशी आहे ? ते समजावून सांगितले. मार्गदर्शनातून विद्यार्थी व उपस्थित कार्यकर्ते यांना बरेच उदाहरणे देत त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी भद्रावती तालुका कार्यकारणी, वरोरा तालुका कार्यकारणी, चंद्रपूर जिल्हा कार्यकारणी, चिमूर तालुका कार्यकारणी, गडचांदूर आधी येथून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते पदाधिकारी या शिबिराला उपस्थित होते. प्रसंगी यावेळी नेरी शहर कार्यकारिणीची घोषणा वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी केली. नेरी येथील कार्यकारणी अध्यक्ष रामचंद्र कामडी तथा सचिव भास्कर अंड्रसकर यांच्या मार्गदर्शनात अकरा पदाधिकाऱ्यांची कार्यकारणीची घोषणा यावेळी पार पडली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राम चिचपाले (अध्यक्ष चिमूर तालुका ग्राहक पंचायत)यांनी, संचालन संगीताताई कामडी( ग्रामपंचायत सदस्य नेरी) यांनी, ग्राहक गीत पद्मश्री नागदेवते ( ग्रामपंचायत सदस्य नेरी)तर आभार भास्कर अंडरस्कर यांनी मानले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी मधुकर सोनुने,भोजराज कामडी, अशोक बंडे, योगिता सोनुने, नानाजी दडमल (ग्रामपंचायत सदस्य नेरी),सिताराम चौधरी वा.एस. पवार महाविद्यालयाचे प्राचार्य तथासर्व प्राध्यापक कर्मचारी रुंद आदींचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाला कार्यकर्ते पदाधिकारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close