अन्नत्याग आंदोलन करत मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला नरवाडीकरांचा पाठिंबा

जिल्हा प्रतिनिधी :अहमद अन्सारी परभणी
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथील मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला नरवाडीकरांचा अन्नत्याग आंदोलन करत पाठिंबा देण्यात आला.

सोनपेठ तालुक्यातील नरवाडी येथील महिलांसह ग्रामस्थांनी शुक्रवार दिनांक ८ सप्टेंबर रोजी येथील हनुमान मंदीर परिसरात एकत्रित येऊन दिवसभरासाठी अन्नत्याग आंदोलन करत मराठा आरक्षणासंदर्भात असलेल्या आपल्या तीव्र भावना व्यक्त करत मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा दिला.
गावातील मुलाबाळांसह,महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.
“एक मराठा लाख मराठा ” , “आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे” ,
“मनोज जरांगे पाटील तुम आगे बडो हम तुम्हारे सात है” या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
यावेळी मराठा आरक्षणावर कायद्याच्या अंतर्गत सखोल चर्चा यावेळी आंदोलनादरम्यान झाली.
अनेक मान्यवरांनी आरक्षण किती गरजेचे आहे हे यावेळी सांगितले.
यावेळी गावातील पांडूरंग जोगदंड, रामेश्वर जोगदंड, गंगाधर जोगदंड, नामदेव जोगदंड,
राजेभाऊ पांडुळे, शिवराज जोगदंड, विष्णू जोगदंड, सिद्धेश्वर पांडुळे ,अर्जुन जोगदंड, गोकुळ पांडुळे, गोविंद जोगदंड, संतोष मस्के, लक्ष्मण जोगदंड, नाना गांगर्डे ,गणेश सपकाळ,गोपाळ कदम भगवान जोगदंड गोपाळ मस्के, गोपाळ जोगदंड, रामानंद जोगदंड, मंगेश जोगदंड ,अमोल गांगर्डे, गणेश माने, ज्ञानेश्वर जोगदंड ,अमोल पांडुळे, कृष्णा पुकाने, गोपाळ जोगदंड, ज्ञानोबा जोगदंड ,मुंजा पुकाने, रतन पांडुळे, कृष्णा वायंगडे, रामेश्वर जोगदंड, उद्धव जोगदंड, गोविंद जोगदंड, अशोक गांगर्डे, भीमराव पिसाळ, आश्रोबा गांगर्डे, महादेव जाधव, गोविंद पिसाळ ,मनोज तोंडगे, उद्धव पांडुळे, गजानन पांडुळे, खंडेराव नागडे, अर्जुन पांडुळे, हनुमान गांगर्डे, मुंजा क्षीरसागर, सिद्धेश्वर कलिंदर, जीवन गांगर्डे, रामेश्वर कलंदर,अनंता गांगर्डे ,गोपाळ कदम, ऋषिकेश जोगदंड, प्रल्हाद जोगदंड अशोक जोगदंड उद्धव वायंगडे श्रीधर जोगदंड अंकुश कलंदर प्रशांत जोगदंड रामेश्वर जोगदंड नामदेव पांडुळे सुभाष कलिंदर रामदास जोगदंड शकील पठाण मुंजा जाधव मोतीराम धोंडगे श्याम पांडुळे भगवान जोगदंड पांडुरंग जोगदंड बाळासाहेब नरवाडे संतोष मस्के भगवान मस्के परमेश्वर पांडुळे अशोक काळे हनुमान पांडुळे गणेश पांडुळे माणिक जाधव शिवराज बोचरे समाधान निकम ओंकार पांडुळे सोपान जोगदंड धनंजय कदम कैलास पवार गणेश गांगर्डे योगेश शिंदे वैजनाथ गांगर्डे उमाजी जोगदंड उद्धव गांगर्डे प्रल्हाद जोगदंड नागेश गांगर्डे यांच्यासह असंख्य मुलाबाळांसह महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.
दरम्यान सोनपेठ पोलिसांकडून सहाय्यक पोलिस निरिक्षक सुनिल अंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
सामुहिक राष्ट्रगीताने आंदोलनाची सांगता करण्यात आली.
आंदोलनाला वेगवेगळ्या क्षेत्रातील विविध मान्यवरांकडून भेट देऊन पाठिंबा
भारत राष्ट्र समितीचे माणिक कदम,सुधिर बिंदू, राष्ट्रवादीचे ॲड.श्रीकांत विटेकर,दशरथ सुर्यवंशी,,समीयोद्दीन काझी,उक्कडगावचे भाऊसाहेब मोरे, बोंदरगावचे मदन सपकाळ, खडका येथील राकेश यादव, सोनपेठ शहरातील नारायण रोडे,धनंजय मोहिते यांनी भेटी देऊन नरवाडी येथील अन्नत्याग आंदोलनात सहभागी होत आपला पाठिंबा दिला .