ताज्या घडामोडी

चंद्रपूर कला अकादमीच्या अनिकेतची जागतिक गगन भरारी

दुबईत BEST OF APLF अवार्ड सन्मान

कलेच्या विविध क्षेत्रातील एनजीओ व मंडळीनी केले अभिनंदन!

तालुका प्रतिनिधी:ग्यानीवंत गेडाम वरोरा

चंद्रपूर आदिवासी बहुल जिल्ह्यात भद्रावती ऐतिहासिक नगरीत गौतम नगर येथे वास्तव्यास असलेल्या .अनिकेत संजय माथनकर यांनी जागतिक BEST OF APLF LEATHER अवार्ड डिझाईन बॅग स्पर्धेत सहभाग दर्शवित .दुबई येथे वर्ड सेंट्रल हॉल मध्ये आयोजित (APLF)डिझाईन बॅग स्पर्धे मध्ये भारताचे नेतृत्व करीत ,भारताची शान उंचावत महाराष्ट्रातील विदर्भात चंद्रपूर जिल्ह्याचा कलेच्या माध्यमातून गौरवास्पद पात्र ठरलाय. अनिकेत मध्यमवर्गीय कुटुंबातील असून वडील पदवीधर शिक्षकी पेशातील असून- आई गृहिणी आहेत. थोरला बंधू संकेत माथनकर पुणे येथे अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करून यूपीएससी च्या तयारी करीत आहे.
अनिकेत ला लहानपणापासूनच कलेची आवड असल्याने सातव्या वर्गापासून सलग भद्रावती येथील रवींद्र तिराणिक यांच्या कला अकादमीत चार वर्ष पूर्व प्राथमिक कलेच्या अभ्यासक्रमाचे धडे गिरवत( इंटरमिजिएट ग्रेड) चित्रकला परीक्षा गुणवत्ता श्रेणी प्राप्त केली असून ,नाना विविध स्पर्धेत कला प्रदर्शनात सहभाग दर्शवित सन्मानपत्र मिळवले आहे. अनिकेतला कलेच्या माध्यमातून डॉक्युमेंटरी करण्याची विशेष आवड आहे.
अनिकेत माथनकर यांनी पुणे येथे कलेच्या क्षेत्रात (फाउंडेशन) पायाभूत अभ्यासक्रम केला असून, पुढे बारावीनंतर (बॅचलर ऑफ फाइन आर्ट) बी. एफ. ए. करावयाचे होते. परंतु योगायोगाने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी(National lnstitute of Fashion Technology) चेन्नई येथे बॅचलर ऑफ डिझाईन या चार वर्षाच्या डिग्री कोर्स अभ्यासक्रमा करिता त्याची निवड झाली. चेन्नई येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी चालू प्रथम वर्षात कलेच्या माध्यमातून डिजाईनचे धडे गिरवीत असतानाच आंतरराष्ट्रीय स्तरावरील APLFडिझाईन बॅग स्पर्धेत( Desigh a Bag International Competition)भाग घेतला. हे मात्र विशेष गौरवात्मक आहे . जागतिक स्तरावरील अवार्ड्स स्पर्धेत .प्रथम पहिल्या फेरीत विविध राष्ट्रातील देशातील 30 स्पर्धकांची निवड करण्यात आली होती. त्यात भारत देशातील अनिकेत ची टॉप थ्री मध्ये निवड झाली. टॉप थ्री मध्ये निवड होताच अनिकेत ला 500 डॉलर कॅश प्राईज दुबई फ्री तिकीट इंटरनॅशनल हॉटेल ला राहण्याची सोय जागतिक अवार्ड कंपनीच्या माध्यमातून करण्यात आली होती.
दुसऱ्या फेरीत नील ब्रायन (कॉपी स्टाँनो )फिलिपिन्स आणि हाँगकाँग देशातील अमरा बॅग डिजाइनर आणि भारतातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी चेन्नई. अनिकेत माथनकर यांची निवड झाली.
अंतिम फेरी करता 31 मार्च2022 ला दुबई येथे( BOAA and DAB)APLFअवार्ड प्रस्तुत, कॉकटेल मंच जागतिक स्तरावरील स्पर्धेत उपस्थित राहून सहभाग दर्शविला . दुबई येथे आयोजित
APLFअवार्ड मुख्य संयोजक असलेल्या जागतिक स्तरावरील कार्यक्रमात पंधरा देशातील लेदर डियर ,मेन मटेरियल ,एक्सपोजर , लेदर टँनेरीज ,डिझाईन कलात्मक स्टॉल जागतिक प्रदर्शनी दिनांक 30 मार्च ते 1 एप्रिल 2022या कालावधीत दुबई येथे आयोजित करण्यात आली होती . यात भारत देशातील स्टाँलचा ही प्रामुख्याने सहभाग लाभला.
बेस्ट ऑफAPLF अवार्ड2022 दुबई वर्ल्ड सेंट्रल हॉल मध्ये
जागतिक स्तरावरील कार्यक्रमात प्रमुख मान्यवर(CLE) संचालक संजय लिखा, मोतीलाल सेठी (सरोज इंटरनेशनल ग्रुप ऑफ कंपनी )इंडिया, मोहसन गुल (गुलवेज फॅशन) पाकिस्तान, बगे डिझाईन्स मध्ये सादरीकरण करण्यात आले. सदर स्पर्धेत नील ब्रायन (फिलिपिन्स) प्रथम विजेता, अनिकेत माथनकर (भारत) अरसुटोरिया स्टुडिओ सब क्रिएशन अवार्ड विजेता तसेच (एक वर्षीय विविध पातळीवर नामांकित सहभाग घोषित करण्यात येऊन गौरव करण्यात आला . दुबई येथील आयोजित कार्यक्रमात भारत देशातील दुबई येथे वास्तव्यास असलेल्या विविध मान्यवरांनी अनिकेत चे भरभरून कौतुक करीत अभिनंदन केले. जागतिक स्तरावरील स्तरावरील स्पर्धेत विविध दहा देशातील नामांकित फॅशन डिझाईन क्षेत्रातील कंपनीचे चेअरमन प्रामुख्याने उपस्थित होते. गौरवाने मान उंचावत भारत देशाचे नेतृत्व करणारा अनिकेत माथनकर दुबईहून आज भारतात पोहोचला असून नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी चेन्नई येथे जागतिक स्तरावर भारताचा गौरवास्पद सहभाग दर्शवून सन्मान प्राप्त केल्याबद्दल अनिकेत माथनकर यांचा गौरव करण्यात आला त्यांनी केलेल्या कलाकौशल्य डिझाईन्स संदर्भात विविध स्तरावरून अभिनंदन व्यक्त करण्यात येत असून चंद्रपूर जिल्ह्याच्या वतीने कला अकादमीत सत्कार करण्यात येणार आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close