खिरत फातिमा यांचा पहिला रोजा पुर्ण

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
मानवत येथील खडक पुरा परिसरातील रहिवासी खिरत फातिमा शेख नविद यांनी आपल्या आयुष्यातील पहीला रोजा (उपवास) दी.१० एप्रिल २०२३ सोमवार रोजी पुर्ण केल्या बद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.
मुस्लिम धर्मियांचा पवित्र रमजान महिना सध्या सुरू असून त्यात उन्हामुळे तीव्रतेमुळे चांगलाच कस लागला आहे परंतु इस्लाम धर्माचा पाच कर्तव्य मधील उपवास रोजा हा एक प्रमुख कर्तव्य मानला जातो त्यामुळे उष्णतेचा तीव्रतेचा उपवास रोजा ठेवतात यात लहान मुलेही आपल्या आयुष्यांचा पहिला रोजा ठेवतात आपल्या वयाचा अवघ्या सातव्या आठव्या वर्षी यांनी आपला जीवनातला पहिला रोजा ठेवला जवळपास उपवास हा १४ तासाचा असून उपवासात पाणी पिणे सुद्धा जमत नसते सध्या उन्हाचा पारा चढला असुन मोठ्या माणसाला पाण्याची तहान लागत आहे परंतु खिरत फातिमा यांनी उपवास ठेवल्यामुळे त्यांचे वडील नविद शेख, चुलता पत्रकार रियाज शेख, चुलता शहाबोदीन शेख, अंकल एजास खान, भाऊ इम्तियाज खान, अंकल सय्यद फेरोज, अंकल शेख गौस, अंकल उमर खलील फारूक, भाऊ अरफात रहेमान, भाऊ फरीद रहेमान, भाऊ मोहम्मद हुजै़फा, नाना गफ्फार सिद्दिकी, मामा इफ्तेखार सिद्दिकी, मामा विखार सिद्दिकी, सनाऊल्ला खान, यांच्यासह खडक पुरा परिसरातील नागरीक या चिमुकल्यांचा कौतुक करीत शुभेच्छा देत आहे.