ताज्या घडामोडी

आजच्या तरुणांनी छत्रपती संभाजी महाराजांचा आदर्श घेऊन प्रयत्नवादी बनावे – माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

संभाजी ब्रिगेड परभणी आयोजित छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव सोहळ्यात असे प्रतिपादन त्यानी केले
परभणी: परभणी येथील उघडा महादेव परिसरात आज स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त जाहीर व्याख्यान व सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते त्यांनी छत्रपती संभाजी महाराज आणि आजचा युवक या विषयावर बोलत असताना त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांचे जिवनचरित्र मांडताना संभाजी महाराजांचा पराक्रम, त्यांचे अनेक भाषांचे ज्ञान, संस्कृत भाषेवर असलेली पकड, आलेल्या अंतर्गत फितुरी व अनेक संकटांवर मात करत अजिंक्य राहिलेले संभाजी महाराज अशा विविध विषयावर तरुणांना मार्गदर्शन केले. यावेळी बाल व्याखाती अरोही खंदारे हिने विचार व्यक्त केले तर उदघाटक अजय गव्हाणे, तर अध्यक्ष म्हणून मेंदु विकार तज्ञ डॉ दत्तात्रय किरडे हे उपस्थित होते.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून एन आय काळे, दिलीप मोरे, वकील संघाचे अध्यक्ष बी. टी. पौळ, नरहरी वाघ,सुभाष ढगे , कृ.बा.समिती संचालक सुरेश भुमरे,बी एम जाधव, सुरेश चव्हाण,नितीन देशमुख हे उपस्थित होते.
कार्यक्रमाची प्रस्तावना महानगर अध्यक्ष गजानन जोगदंड तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व्याख्याते सखारमजी रणेर यांनी केले.तर आभार बालाजी मोहिते जिल्हाप्रमुख यांनी केले

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संभाजी ब्रिगेडचे विभागीय कार्याध्यक्ष नितीन देशमुख, महानगर अध्यक्ष गजानन जोगदंड जिल्हाप्रमुख बालाजी मोहिते,बालाजी जावळे,प्रीतम पैठणकर,शिवाजी तोलमारे स्वप्नील गरुड,वाघ साहेब, नरसाळे साहेब,मराठा सेवा मंडळ अध्यक्ष मंगेश भरकड, गोविंद इक्कर,अमोल अवकाले,प्रलाह राठोड, तुकाराम सावंत,अंगद मस्के, राजाभाऊ येटेवड,सिद्धार्थ उघडे, यांनी परिश्रम घेतले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close