जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा ढाकनी येथे बालीका दिवस व सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी
मुख्य संपादक :कु. समिधा भैसारे
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा ढाकणी येथे 3 जानेवारी 2022 सोमवारला बालीका दिवस व सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
याप्रसंगी वेशभूषा स्पर्धाचे आयोजन करण्यात आलेले होते रंग-बिरंगी पोशाखात लहान लहान चिमुकल्या लेख मोठ्या उत्साहाने नटून थटून स्पर्धेत भाग घेतला प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाला सन्माननीय गोटेफोडे सर केंद्रप्रमुख जातीने हजर राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच सन्मानिय ठाकरे सर मुख्याध्यापक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले श्री. बंबार्डे सर, यांनी छान कविता गायन केले. श्री.रोडे सर, यांनी कार्यक्रमाचे संचालन केला तर कार्यक्रमाचे आभार बनसोडे सर यांनी सहकार्य केले.
आणि सर्व जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा ढाकणी येथील सम्पूर्ण विद्यार्थी उपस्थित होते.