आष्टी – चामोर्शी मार्गावर भीषण अपघात

दुचाकीवरील तिघे जागीच ठार
ग्रामीण प्रतिनिधी:महेश शेंडे विठ्ठलवाडा
आष्टी-चामोर्शी मार्गावरील आष्टी पासून 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या उमरी जवळ ट्रक व दुचाकीच्या भीषण अपघातात दुचाकीवरील तिघे जण जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
बुधवारला दुपारी साडेतीन च्या सुमारास चामोर्शी वरून आष्टी कडे जाणाऱ्या ट्रक क्रमांक AP 16 TY 6822 आष्टी कडून चामोर्शी कडे जाणाऱ्या दुचाकी क्रमांक MH 33 Y 4295 ला जबर धडक दिली यात दुचाकीवरील तिघे जण जागीच ठार झाले.
मृतकात सूरज बालाजी कुसनाके वय 35 रा मुधोली ता चामोर्शी जि गडचिरोली ललिता नितेश कुसनाके वय 25वर्ष रा मुधोली रिठ ता चामोर्शी जि गडचिरोली रितिका नितेश कुसनाके वय 4 वर्ष रा मुधोली रिठ ता चामोर्शी जि गडचिरोली यांचा समावेश आहे.
यामध्ये ललिता कुसनाके व रितिका ही आई आणि मुलगी असून सूरज हा ललिता कुसनाके यांचा दिर आहे. सूरज कुसनाके आपल्या वहिनी व पुतणीला गोंडपीपरी येथे दवाखान्यात उपचारासाठी नेले होते. उपचार घेऊन परतत असताना काळाने कुसनाके कुटूंबीयावर घाला घातला. हा अपघात इतका भीषण होता की यात दुचाकीवरील 4 वर्षीय रितिका चा मेंदू अक्षरशः बाहेर निघाला तर दुचाकी जळून खाक झाली. एकाच कुटुंबातील तिघे जन अपघातात दगावल्यामुळे गावात शोककळा पसरली आहे.