ताज्या घडामोडी

शासकीय आश्रम शाळा , कोसंबी गवळी येथे प्रवेशोत्सव व पालक मेळावा साजरा

नवागत विद्यार्थ्यांचें पुष्पगुच्छ व पुस्तके देऊन स्वागत

डिजीटल वर्गखोली व अद्यावत संगणक कक्षाचे उद्घाटन

तालुका प्रतिनिधी:कल्यानी मुनघाटे नागभीड

आदिवासी विद्यार्थ्यांचे नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात आनंददायी उत्साहाने होण्यासाठी दिनांक २९ जून २०२२ ला नागभीड तालुक्यातील शासकीय माध्यमिक आश्रम शाळा , कोसंबी गवळी येथे प्रवेशोत्सव व पालक मेळाव्याचे उद्घाटन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी केशवजी बावनकर यांनी केले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी माजी जि. प. सदस्य संजय गजपुरे होते . प्रमुख अतिथी म्हणुन माजी जि. प. सदस्य खोजरामजी मरसकोल्हे , नागभीडचे ठाणेदार राजु मेंढे व प्रकल्पस्तरीय नियोजन समिती सदस्या श्रीमती भावना ईरपाते यांची उपस्थिती होती.
सर्वप्रथम गावात प्रभातफेरी काढली,नवागत विद्यार्थ्यांचें मान्यवरांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.तसेच सर्व विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप करण्यात आले.इयत्ता 10 वी चे प्राविण्य प्राप्त विध्यार्थ्यांनीचे सत्कार करण्यात आले.विद्यार्थ्यांचा गुणवत्ता विकास व्हावा करिता नवीन शैक्षणिक प्रणाली भविष्यवेधी शिक्षण च्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण विद्यार्थी घडतील अशी आशा मा प्रकल्प अधिकारी श्री केशवजी बावनकर यांनी व्यक्त केली तसेच शाळेला आवश्यक भौतिक सुविधा कमी पडू देणार नाही असे आश्वासन दिले.तर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री संजयजी गजपुरे यांनी शाळा अतिशय सुंदर असून शिक्षकांची २४ तास जबाबदारी असल्याचे सांगितले. या गावाला प्रशस्त ग्रंथालय उपलब्ध करून देण्याची मागणी प्रकल्प अधिकारी यांना केली तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री खोजराजजी मरसकोल्हे प्रकल्प स्तरीय नियोजन आढावा समिती सदस्य चिमूर यांनीही शिक्षकांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणुन कोसंबी गवळी चे सरपंच दिलीपजी रंदये, उपसरपंच हेमणे , कृऊबास संचालक धनराज ढोक , प्रसादजी वल्लरवार वैद्यकीय अधिकारी,शाळा समिती अध्यक्ष भय्याजी दडमल, ग्रा. पं. सदस्य कैलास रंदये,गुरुदेव नागापुरे,तुकाराम रंदये,खंडाते गृहपाल तसेच ४० गावातील १०० पालक व ११० विद्यार्थी हजर होते.
कार्यक्रम चे प्रास्ताविक मुख्याध्यापक पी. एस. भांडारकर यांनी केले व सणानिमित्त मुलाला गावाला नेऊ नये असे आवाहन पालकांना केले. शेवटी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.तसेच डिजिटल वर्गखोली व अद्यावत संगणक कक्षाचे फीत कापून उदघाटन करण्यात आले कार्यक्रमाचे संचालन कु . एम.बी.श्रीरामे यांनी केले तर आभार प्रदर्शन व्ही. एल. कसारे यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करिता मुख्याध्यापक,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close