ताज्या घडामोडी

ट्रॅक्टरला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्नात दुचाकीस्वाराचा मृत्यु

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

परभणी: ट्रॅक्टरला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न दुचाकीस्वाराचा जीवावर बेतला आहे. परभणीच्या पाथरी तालुक्यातील हदगाव बु .पाटीजवळ ट्रॉलीमध्ये दुचाकी अडकून एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे.तर एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. सदरील घटना शनिवार 2 एप्रिल रोजी घडली आहे. अमोल बालासाहेब काळे असे मूर्त युवकाचे नाव आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी सदरील अपघात घडला असल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील लिंबोनी येथील अमोल बाळासाहेब काळे( वय 24 वर्ष), युवराज विष्णू काळे हे दोघेजण घनसावंगी येथेन दुचाकी क्रमांक एम एच 21 एयु 0888 वरून सकाळी पाथरी मार्गे परभणी कडे जात होते. त्यांची गाडी पाथरी तालुक्यातील हादगाव बु पाटीजवळ मरडसगाव कडे जाणाऱ्या रस्त्या जवळ अली असता त्यांनी डबल ट्रॉली लावलेल्या ट्रॅक्टरला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला असता दुचाकी मागीला ट्रॉलीखाली आडकली.
यामध्ये अमोल काळे याचा जागीच मृत्यू झाला.तर अपघातामध्ये युवराज काळे जखमी झाला. अपघाताची माहिती पाथरी पोलिसांना समजल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक अमोल गंगनवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. जखमी युवराजा काळे याला उपचारासाठी पाथरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close