चिमूर विधानसभेतील पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांना शासनाने सेवेत सामावून घ्यावे अन्यथा आंदोलन करू – आम आदमी पार्टी चा ईशारा.
प्रशासनाच्या दुर्लक्षपणामुळे अनेक पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांचे नुकसान झाल्याचा आरोप.
प्रा. डॉ. अजय घनश्यामजी पिसे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा.
उपसंपादक :विशाल इन्दोरकर
मागील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांच्या समस्याकंडे शासनाने त्वरित लक्ष देवून नवीन जी.आर. प्रमाणे त्यांना सेवेत सामावून घ्यावे अन्यथा आंदोलन करू अशी मागणी आम आदमी पार्टी चिमूर विधानसभेतर्फे जिल्हाधिकारी यांना करण्यात आली.
चिमूर विधानसभेतील अनेक वर्षांपासून दुर्लक्षित असलेल्या पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांना चंद्रपूर जिल्ह्यातील रिक्त पदांवर सेवेत सामावून घ्यावे या मागणीसाठी आम आदमी पार्टी चे जिल्हाध्यक्ष सुनीलजी मुसळे, कोषाध्यक्ष भिवराजजी सोनी, तसेच पदवीधर अंशकालीन कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी यांनी आप चे चिमूर विधानसभा प्रमुख प्रा. डॉ. अजय घनश्यामजी पिसे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांशी भेट घेवून सविस्तर चर्चा करून मागणीपत्र दिले.
नवीन जी.आर. प्रमाणे पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांना शासकिय सेवेत सामावून घेण्यासबंधी प्राधान्य देण्यात यावे असे नमूद असतांना, तसेच अन्य काही जिल्ह्यामध्ये पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेतले असतांनाही चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत या संदर्भातील निर्णय तातकळत ठेवण्यात आला. प्रशासनाच्या दुर्लक्षपणामुळे अनेक पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांचे नुकसान झाले असून यावर तात्काळ निर्णय घ्यावा असे चर्चेदरम्यान जिल्हाधिकार्यांना सांगण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांनी या तक्रारीची दखल घेवून पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांना चंद्रपूर जिल्ह्यातील रिक्त पदांवर सेवेत सामावून घेण्याची प्रक्रिया लवकरच चालू करू असे आश्वासन दिले.
याप्रसंगी पदवीधर अंशकालीन कर्मचारी संघटनेचे महादेव गुरनुले, गोसाई मोहुर्ले, दिलीप काकोडे, प्रकाश पाटील, आनंदराव टेंभूर्ने, राष्ट्रपाल डांगे, भारत कोकडे, बाबाकर मेश्राम, राजू इंदोरकर, राजेंद्र डांगे, रतिराम पाटील, प्रकाश धानोरकर, राजेंद्र नन्नावरे, भीमराव बन्सोड, पत्रू पाटील, माणिक पिसे, पोईतराम गभने, मनोहर वासनिक, लक्ष्मण मेश्राम उपस्थित होते.