पाथरी शहरात भव्य करियर मार्गदर्शन शिबिर;पुणे येथील मराठवाडा युवामंचचा सामाजिक उपक्रम
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
पाथरी:-शहरातील पाथरी-मानवत महामार्गालगत असलेल्या अंजली लॉन्स येथे शनिवार २४ नोव्हेबर रोजी सकाळी ९ ते १२ या वेळेत पुणे येथील मराठवाडा युवामंचच्या वतीने परभणी जिल्ह्यातील १०वी ११वी १२वी डिप्लोमा व पदवी विद्यार्थ्यां साठी भव्य करीयर मार्गदर्शन मेळावा संपन्न होणार असल्याची माहिती सत्यजित चौधरी यांनी स्व नितीन महाविद्यालयात प्राचार्य डॉ आर एस फुन्ने यांची भेट घेऊन निमंत्रन दिल्या नंतर दिली.
या वेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून पोलीस उपमहासंचालक मंचक इप्पर,परभणीचे अतिरिक्त महासंचालक प्रताप काळे,प्रकल्प संचालक रश्मी खांडेकर,मुख्य लेखा व वित्त अधिकारी सचिन कवठे,उपमुख्यकार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव,नांदेड येथील जिल्हाउद्योग केंद्राचे मॅनेजर अमोल इंगळे,मुख्याधिकारी कोमल सावरे,भरत गित्ते,संतोष ढगे हे विविध विषयांवर माेलाचे मार्गदर्शन करणार आहेत.
या वेळी प्रमुख उपस्थितीत स्व नितीन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ राम फुन्ने,के एन डहाळे,ए आर टेंगसे,ए जी शेळके,प्राचार्य डि ए चौरे,जी जी पितळे,डि एन गिरी,प्रा.ए बी वाघमारे,पि डी वानखेडे,प्रा एस एल पवार,शामराव शिंदे,पि एस महाजन,प्रा एल बी पाठक,रामराव दुगाने,सुनिल दुमाने,शांतीलिंग काळे,शिवराज नाईक,डॉ जगदिश शिंदे,राजेश ढगे,सदाशिव थोरात,प्रकाश रोकडे यांची उपस्थिती राहाणार आहे.
या शिबिरात मराठवाडा युवा मंचच्या ध्येय व उदिष्टा प्रमाणे सामाजिक बांधिलकी जपत आपण समाजाचे काही देणे लागतो या कर्तव्य सद्भावनेची जाणीव ठेवून शनिवार दि. २४ डि सेंबर २०२२ रोजी सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत परभणी जिल्हयातील इ. १० वी, ११ वी, १२ वी, डिप्लोमा व पदवीधर विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा, इ. १० वी, १२ वी व पदवीनंतर काय करावे याचे मार्गदर्शन प्रशासकीय अधिकारी व यशस्वी उद्योजक यांचे मार्फत लाभणार आहे.
तरी सर्व विद्यार्थ्यांनी व पालकांनी या करियर मार्गदर्शन शिबीराचा लाभ घ्यावा अशी विनंती नियोजन समितीचे सत्यजित चौधरी,राम चिंचोले,अनंतराव शिंदे,अनंत टमके,धोंडीराम कोल्हे,विष्णू कोल्हे,पांडूरंग कोल्हे,तुकाराम पौळ,राजेश ढगे,ज्ञानेश घांडगे,शरद कोल्हे,केशव आरडे,शाम घांडगे, या सह अन्य सदस्यांनी केली आहे.