ताज्या घडामोडी

चिमूर येथे ६९ वा अखिल भारतीय सहकारी सप्ताहाच्या निमित्ताने दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

तालुक्यातील ३३ पदाधिकाऱ्यांनी घेतले प्रशिक्षण .

संपादक:कु.समिधा भैसारे

महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्यादीत पूनेचे सहकारी शैक्षणिक उपक्रमा अंतर्गत चंद्रपूर जिल्हा सहकारी बोर्ड लिमिटेड चंद्रपूर व जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था चंद्रपूर यांचे वतीने चिमूर तालु्यातील कृषी पुरवठा आदिवासी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचे अधिकारी व सेवकांसाठी 69 वा अखिल भारतीय सहकारी सप्ताहाच्या निमि्ताने दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम दिनांक 17 व 18 नोव्हेंबर या मुदतीत सकाळी 11.30 ते 5.30 या वेळेत तालुका देखरेख सहकारी संस्थेचे सभागृहात चिमूर येथे पार पडले .
सदर प्रशिक्षणाचे पहिले सत्र दिनांक 17 नोव्हेंबर रोजी उद्घाटन चिमूर तालुका सहायक निबंधक एस बी सहारे यांचे शुभ हस्ते संपन्न झाले, एस बी सहारे यांनी सहकारी कायदा व नवीन तरतुदी या विषयावर मार्गदर्शन केले, तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक व कृषी पत पुरवठा संस्थांचे उद्देश, कार्य आणि व्यवस्थापन विषयावर बी सी फलके जिल्हा सहकार विकास अधिकारी चंद्रपूर जिल्हा सहकारी बोर्ड यांनी प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले, तसेच सहकारी संस्थांचे आडीट व दोष दुरस्ती अहवाल या विषयावर सहायक लेखा परीक्षक आर एस लांडगे यांनी मार्गदर्शन केले .
दिनांक 18 नोव्हेंबर 2022 रोजी सेवक सहकारी प्रशिक्षण वर्गाचे द्वितीय सत्त्रात जिल्हा सहकार विकास अधिकारी चंद्रपूर बी सी फलके यांनी सचिवाची कामे अधिकार आणि जबाबदाऱ्या तसेच सहकारी संस्थांचे सभा व कार्येरती सभा उर्तांत लेखन आणि कर्यालईन पत्र व्यवहार या विषयावर मार्गदर्शन केले तर सहकार अधिकारी आर के प्रधान यांनी सहकारी संस्थांचे अनिष्ट तफावत संगणक मागणी प्रस्ताव व शासनाच्या वेळी निर्देशित केलेले पत्रव्यवहारही माहिती यावेळी दिली, प्रशिक्षण कार्यक्रमाच्या समारोपाच्या प्रमुख पाहुणे शेतकरी सहकारी राईस मिल चे माजी अध्यक्ष प्राध्यापक दादा दहेकर यांनी मनुष्यबळ विकासाचे महत्व व गरज याबद्दल मार्गदर्शन केले, या प्रसंगी प्रमुख पाहुणे सी टीव्ही न्यूज चे विशेष प्रतिनिधी श्रीहरी सातपुते यांनी महाराष्ट्र राज्य सहकारी संघ पुणे चे सहकारी शिक्षण प्रशिक्षण ग्रामीण भागात तळागळा पर्यंत पोहचविणारे एकमेव शिखर संस्था असल्याचे मत मांडून महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या शैक्षणिक उपक्रमाची प्रशंसा केली, व महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या शैक्षणिक उपक्रमात प्रशिक्षणात अनेक वेळा मी सहभागाचा साक्षीदार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली, सहकारी शिक्षण प्रशिक्षणमुळे, कायदा नियम नवीन बाबींची माहिती मिळत असल्याने व्यक्तीमत्वाचा विकास होतो तसेच तसेच सहकारी संस्था व सभासदांची प्रगती होते असे मत श्रीहरी सातपुते यांनी यावेळी मांडले .
उपस्थित मान्यवरांचे पुष्गुच्छ देऊन सन्मान करून सर्व 33 प्रसिक्षनर्थिना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले यावेळी ज्येष्ठ अधिकारी एस बी सामूसाकडे, एम एन बरडे, ईश्वर कामडी, आर पी दडमल, व्हीं एन पाचभाई, यांचा पुष्गुच्छ देऊन जिल्हा सहकार विकास अधिकारी बी सी फलके यांनी सत्कार केला, सर्व प्रशिक्षणार्थीनी आपल्या प्रतिक्रियेत सदरचे प्रशिक्षण प्रथमच अत्यंत उपयोगाचे व मौलिक कामाची माहिती मिळाली असे मत व्यक्त केले शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close