ताज्या घडामोडी

आम आदमी पार्टी कडून लखीमपूर खिरी येथिल हत्याकांडाचा निषेध व शहीद झालेल्या शेतकऱ्यांना कैंडल मार्च काढून श्रद्धांजली

उपसंपादक :विशाल इन्दोरकर

केंद्र सरकारच्या तीन काळ्या कायद्याविरोधात मागील दहा महिन्यापासून दिल्ली येथील सीमेवर सुरू असलेल्या आंदोलनाचा समर्थनार्थ लखीमपूर खिरी येथे रविवारी सुरू असलेल्या निदर्शनाच्या वेळी केंद्रीय गृह राज्यमंत्री ह्यांच्या मुलाने आपल्या कारने आंदोलन कर्त्या शेतकऱ्यांच्या अंगावर कार चालवून शेतकऱ्यांची हत्या केली, शांततेने आपल्या मागण्या मान्य कराव्यात यासाठी आन्दोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचा हकनाक बळी गेला. त्यानंतर झालेल्या हिंसाचारात आणखी चार शेतकऱ्यांचा शहीद व्हावे लागले. ह्या घटनेचे गंभीर, संतापाचे वातावरण निर्माण होऊन त्याचे पडसाद संपूर्ण भारतात उमटले. ह्या घटनेच्या निषेधार्थ आम आदमी पार्टीतर्फे काल दिल्ली येथे तसेच शेतकरी संघटनांनी देशभर निदर्शने केलीत.
ह्याच घटनेच्या निषेधार्थ आज नागपूर येथे मुंजे चौकातुन कैंडल मार्च काढून गांधी पुतळा, व्हेरायटी चौक येथे आम आदमी पक्ष, नागपूर तर्फे जुलमीं तानाशाह सरकार विरोधात निषेध व्यक्त करून शहिद शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच पक्ष कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी मूक निदर्शने केलित.
श्रद्धांजली कार्यक्रमावेळी पक्षाचे उच्च पदस्थ पदाधिकारी श्री डॉ देवेंद्र वानखडे, श्री. जगजीत सिंग, अमरीश सावरकर, कविता सिंघल, अशोक मिश्रा, डॉ शाहीद जाफरी, अजय धर्मे, प्रशांत निलटकर, संतोष वैद्य, सुरेश खर्चे, प्रमोद नाईक, पुष्पा ढाबरे, देवेंद्र परिहार, शिरीष तिडके, बाबूभाई पटेल, जीतू सिन्हा, आकाश राठौड़, पायल शेंडे, चमन बम्नेले, मधुकर राऊत, रोशन डोंगरे, प्रदीप पौनिकर, गुणवत सोमकुंवर, विजय नंदनवार,सौरभ दुबे,पंकज मिश्रा, मानसिंग अहिरवार, सचिन काम्बले, स्वीटी इन्दोरकर, योगेश पराते, नम्रता मिश्रा, मनोज डाफरे, सुरेंद्र समुद्रे, राजेश तिवारी ,संजय जिवतोडे, राकेश उराडे, सोनू फटिंग, राजेंद्र शेलकर, प्रभाकर मोटघरे, प्रतीक बावनकर, प्रणय महल्ले, राहुल वासमवार समीर सहारे, प्रभात अग्रवाल, लक्ष्मीकांत दांडेकर, सागर जयस्वाल, पियुष आकरे, कृतल आकरे, हरीश वेलेकर, संजय बारापत्रे, विशाखा दुपारे, संगीता भोसले, तलवारे, निर्मला ताई, आबिद शेख, गीता कुहीकर, शालिनी अरोरा, आकाश कावळे, अल्का पोपटकर, संजय सिंह, हेमंत बंसोड़ सुनील सिन्हा, प्रियंका आंग्रे
तसेच अनेक कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close