हादगाव बु. येथील नाला सरळीकरणाचे काम मंजूर करा

रा.काँ.महिला जिल्हाध्यक्षा भावनाताई नखाते यांची जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचेकडे मागणी.
जिल्हा प्रतिनिधी :अहमद अन्सारी परभणी
पाथरी तालुक्यातील हादगांव बु.येथील अरुंद नाला हा ग्रामस्थांसाठी धोकादायक बनत असुन सुरक्षीततेच्या दृष्टीने या नाल्याचे तातडीने सरळीकरणाचे काम मंजूर करावे अशी मागणी रा.काँ.महिला जिल्हाध्यक्षा भावनाताई नखाते यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचेकडे शुक्रवारी केली आहे.
जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे २४ सप्टेंबर रोजी परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते.जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकी प्रसंगी रा.काँ.महिला जिल्हाध्यक्षा भावनाताई नखाते यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची भेट घेतली.आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचे समवेत त्यांनी हादगांव बु.येथे नाला सरळीकरणाचे कामास तातडीने मंजुरी द्यावी असे निवेदन दिले आहे. या निवेदनात हादगाव बु. येथे ३१ ऑगस्ट २०२१ रोजी अतीवृष्टी व ढगफुटी होऊन नाल्याचे पाणी इंदीरा नगर येथील झोपडपट्टी भागात जवळपास २०० घरामध्ये पाणी गेले होते.यामागचे मुळ कारण किन्होळा नाला व रेणाखळी नाला हे दोन्ही हादगांव बु.येथे एकत्र येतात व नाला गोदावरी नदीला मिळतो. जायकवाडी कमांड एरीया असल्याने या नाल्यास नेहमी मोठ्या प्रमाणात पाणी येते या पुर्वी अनेकवेळा येथील घरामध्ये पाणी जावून गावकऱ्यांचे माठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे सदरील नाल्याचे तातडीने सरळीकरण करणे आवश्यक आहे.त्यामुळे आपण व्यक्तीशः नाला सरळीकरणाचे आदेश देण्यात यावे असे नमुद केले आहे.