ताज्या घडामोडी

भंगाराम तळोधी येथे मोफत रोग निदान आणि अवयव दान विषयक मार्गदर्शन शिबिर

पोलीस स्टेशन गोंडपीपरी आणि उपपोलिस स्टेशन धाबा यांचा संयुक्त उपक्रम

प्रतिनिधी:महेश शेंडे विठ्ठलवाडा

दि.30 नोव्हेंबर रोज मंगळवार गोंडपिपरी तालुक्यातील भंगाराम तळोधी येथिल जी.प.उच्च प्राथमिक शाळेत पोलीस स्टेशन गोंडपीपरी आणि उप पोलीस स्टेशन धाबा यांच्या संयुक्त विध्यमाने मोफत रोगनिदान व अवयव दान विषशक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
तालुक्यातील नागरिक हजारो च्या संख्येने सदर शिबिरात सहभाग घेतला.
सदर शिबिरात विविध आजारावर मोफत उपचार व तपासणी करण्यात आली.
नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करून औषधी देण्यात आले.
या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून अरविंद साळवे, पोलीस अधीक्षक चंद्रपूर,अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रपूर,शेखर देशमुख पोलीस उप अधीक्षक गृह चंद्रपूर,राजा पवार उपविभागीय पोलीस अधिकारी मूल,
के.डी. मेश्राम साहेब तहसील दार गोंडपीपरी,
डॉ.संदीप बांबोळे बालरोग तज्ञ ,डॉ.घनश्याम पुसनाके, जनरल फिजिसीयन,डॉ श्रुतिका पावडे,स्त्रीरोग तज्ञ, डॉ.विशाल काटकर आयुवेदाचार्या एम डी आयुर्वेद, तुषार अगडे, होमिओपॅथी एम डी
गणेश गेडाम डेंटिस्ट बिडीएस एम डी एस ,पवन गणुरे,नेत्र चिकित्सक, डॉ.योगेंद्र इंदोरकर अवयव दान समूपदेशक यांची उपस्थिती होती.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close