ताज्या घडामोडी

पाथरी तालुका अध्यक्षपदी नेहाल कादरी यांची निवड

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

जिंतूर तालुक्यातील कौसडी येथे आज (दि.३१) वार गुरुवार रोजी इनामदार, मुक्तवली, सज्जादा ट्रस्टीज फेडरेशन(वक्फ) महाराष्ट्र राज्य च्या वतीने जिल्हास्तरीय मेळावा संपन्न झाला.
हया मेळाव्या मधे पाथरी तालुका अध्यक्ष पदी नेहाल कादरी यांची निवड करण्यात आली.
जिल्हास्तरीय सन २०२२ मेळाव्याच्या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून मा.गौस शिरोळकर(अध्यक्ष महाराष्ट्र राज्य) व मुख्य मार्गदर्शक म्हणून अँड मेहबूब निजामी हे उपस्थित होते.
या मेळाव्यात सय्यद अजिम मनसबदार,वाजिद खान,सय्यद साबेर अली,सय्यद जमिल रजवी,इलियासोद्दीन खतीब,शेख चाॅद,डाॅ.फारूख शेख यांचीहि उपस्थिती होती. गंगाखेड, सोनपेठ,पालम,पुर्णा,पाथरी,सेलु,मानवत,जिंतुर तालुक्यातील इनामदार मुक्तवली सज्जादा ट्रस्टीज फेडरेशन चे पदाधिकारी मोठ्या संख्येत उपस्थित होते.वक्फ च्या मालमत्तेवर होणारे अतिक्रमण तसेच इनामीजमीन कब्रस्तान यासह इतर मालमत्तेवर होणारे अतिक्रमणांचा शासन दरबारी पाठपुरावा करून न्याय देण्याचे काम या संघटनेमार्फत करण्याचे उद्दिष्ट समोर ठेउन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.उपस्थितांना गौस शिरोळकर,डिंगाबर सांगळे,सय्यद अजिम मनसबदार,अॅड महेबुब निजामी,सय्यद साबेर अली,सय्यद जमिल रजवी,वाजिद खान,इलियासोद्दीन खतीब यांनी मार्गदर्शन केले.
या जिल्हास्तरीय मेळाव्यास
परिसरातील बहुतांश ईनामदारांसह नागरीकांची उपस्थिती होती. ईनामदार मुक्तवली सज्जादा ट्रस्टीज फेडरेशनचे तालुकाध्यक्ष हाफीजोद्दीन खतीब व सय्यद मोसीन यांनी या जिल्हास्तरीय मेळाव्याचे आयोजन केले होते.मेळावा हजरत सय्यद सादत दर्गा परिसरात संपन्न झाला असुन या जिल्हास्तरीय मेळाव्याचे प्रास्ताविक इलियासोद्दीन खतीब यांनी व सूत्रसंचालन शेख बिलालोद्दीन यांनी केले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close