उपजिल्हा रूग्णालयात आँक्सीजन निर्मिती प्रकल्प उभारणार – ना. विजय वडेट्टीवार
तालुका प्रतिनिधी : हेमंत बोरकर मुल
कोरोना बाधीतांची वाढती संख्या लक्षात घेता स्थानिक पातळीवरच बाधीतांवर तात्काळ उपचार व योग्य सुविधा देता यावी म्हणुन येत्या काळात उपजिल्हा रूग्णालय येथे १ कोटी रूपये खर्चुन आँक्सीजन निर्मिती प्रकल्प निर्माण करून आँक्सीजन पाईप लाईनने जोडलेल्या ५० खाटांची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहीती जिल्ह्याचे पालकमंञी तथा राज्याचे मदत व पुनर्वसन मंञी ना. विजय वडेट्टीवार यांनी दिली.
मूल तालुक्यात कोरोना बाधीतांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असुन तालुक्यात १३ जण मृत्युमुखी पडले आहे. अश्या परिस्थितीत तालुक्यातील जनतेला स्थानिक पातळी वरचं आरोग्य सुविधा मिळावी म्हणुन मूल येथे आँक्सीजन बेडयुक्त सर्वसोयीचे कोरोना केअर सेंटर निर्माण करण्यात यावे. अशी मागणी काँग्रेसचे स्थानिक नेते तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत आणि काँग्रेसच्या स्थानिक पदाधिका-यांनी केली. सदर मागणीच्या अनुषंगाने वास्तविक परिस्थिती पाहुन उपाय योजना करण्यासाठी म्हणुन आज आपण येथील उपजिल्हा रूग्णालयाची पाहणी करून स्थानिक अधिकाऱ्यांकडून माहीती घेतल्याचे सांगतांना ना. वडेट्टीवार यांनी येथील उपजिल्हा रूग्णालयात करण्यात येणारी आँक्सीजन पाईप लाईनयुक्त ५० खाटांची व्यवस्था कोरोना संसर्गाच्या काळातचं नव्हे तर इतर वेळेसही त्याचा लाभ नागरीकांना मिळणार असल्याचे सांगीतले. कोरोना संसर्गाच्या काळात याठिकाणी २२५ खाटांची व्यवस्था करण्यात आली असुन येत्या काळात आवश्यकता भासल्यास पुन्हा १०० खाटांची व्यवस्था करण्याचे निर्देश स्थानिक प्रशासनाला दिले असल्याचे सांगतांना ना. वडेट्टीवार यांनी सध्या याठिकाणी असलेल्या २० आँक्सीजन वेंटीलेटर खाटांच्या व्यवस्थेत पुन्हा २० खाटांची वाढ करण्यात येणार असल्याचे सांगीतले. सध्या आरोग्य विभागात आवश्यक कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने सेवारत अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढत आहे. त्यामुळे आवश्यक वैद्यकीय अधिकारी, परीचारीका व अन्य आरोग्य कर्मचारी येत्या काळात जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातुन नियुक्त करणार असल्याचे ना वडेट्टीवार यांनी सांगीतले, सध्या उपलब्ध असलेली १ रूग्णवाहीका तालुक्यातील जनतेला कमी पडत आहे. त्यामुळे रूग्णाच्या सेवेकरीता खनिज विकास निधी मधुन एक रूग्णवाहीका देणार असुन सहा महीण्यानंतर दुसरी रूग्णवाहीका देण्यासंबंधी सहानुभूती पुर्वक प्रयत्न करण्याचे आश्वासन देतांना वडेट्टीवार यांनी नगर परीषदे कडे सध्या एक लहान शववाहीका असुन ती लहान आहे, त्यामुळे नगर परीषदेने शहरा सोबतचं ग्रामीण जनतेचा विचार करून मोठ्या शववाहीकेची मागणी ठरावानिशी केल्यास जिल्हा विकास निधी मधुन नगर परीषदेला मोठी शववाहीका देण्याचे आश्वासन दिले. तालुक्या सोबतचं जिल्ह्यातील आरोग्य यंञणा बळकट करण्यासाठी येत्या काही दिवसात आरोग्य विभागातील आवश्यक असलेली रिक्त पद भरण्याची प्रक्रीया पुर्ण करणार असल्याचे सांगतांना ना. वडेट्टीवार यांनी आरोग्याच्या दृष्टीने नागरीकांना अपेक्षित असलेल्या सोयींची पुर्तता स्थानिक स्तरावर करणार असल्याचे सांगीतले.
स्थानिक अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यापुर्वी ना. विजय वडेट्टीवार यांनी येथील उपजिल्हा रूग्णालयातील व्यवस्थेची पाहणी केली. यावेळी उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर, तहसिलदार डाँ. रविंद्र होळी, प्रभारी वैद्यकीय अधिक्षक डाँ. उज्वल इंदोरकर, तालुका वैद्यकीय आधिकारी डाँ.सुमेध खोब्रागडे, मुख्याधिकारी सिध्दार्थ मेश्राम, संवर्ग विकास अधिकारी मयुर कळसे यांचेकडून तालुक्यातील आरोग्य व्यवस्था व इतर उपलब्ध सोयीबाबत आढावा घेतला. यावेळी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष घनश्याम येनुरकर, संजय गांधी निराधान योजनेचे अध्यक्ष राकेश रत्नावार, नगर सेवक विनोद कामडे, बाजार समिती संचालक अखील गांगरेड्डीवार, शांताराम कामडे, हसन वाढई आदी उपस्थित होते.