ग्रामपंचायत बाघोली येथील तंटामुक्ती समिती अध्यक्ष व पोलीस पाटील यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून तात्काळ हटवण्याची मागणी

उपसंपादक: विशाल इन्दोरकर
गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुका येथील ग्रामपंचायत बाघोली येथील तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष हेमराज बिसेन व पोलीस पाटील हौसकुमार बिसेन यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून तात्काळ पदावरून हटविण्यात यावे याबाबतचे निवेदन जिल्हा पोलिस अधिक्षक गोंदिया यांच्याकडे आनंदराव गोवर्धन रहांगडाले यांनी एका लेखी तक्रारी द्वारे केली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की अर्जदार शेतीचे काम करतो गैरअर्जदार हे तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष व पोलीस पाटील पदावर कार्यरत असून याच गावातील रहिवासी असताना व अर्जदाराची परिस्थिती गरिबीची असताना गैरअर्जदार पोलीस पाटील व तंटामुक्ती समिती अध्यक्ष यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून गोंदिया येथील खाजगी लक्ष्मी फायनान्स लक्ष्मी बँक शाखा गोंदिया या खाजगी बँकेच्या वतीने बँक संचालक सोबत संगनमत करून व मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून पोलीस पाटील व तंटामुक्ती अध्यक्ष यांना कोणताही कायदा गावाच्या अतिरिक्त कर्ज वसुली करण्याचा कोणताही अधिकार नसताना दिनांक 21 मार्च 2022 आपल्या लेटर हेड चा उपयोग करून स्वतःची स्वाक्षरी व शिक्का मारून अर्जदार याला दडपण आणून खाजगी बँकेच्या वतीने पत्र पाठवून मानसिक व शारीरिक त्रास दिला आहे .कर्जवसुलीसाठी पोलीस पाटील या पदाची नियुक्ती गावात करण्यात येत नाही.

गावात कायदा व सुव्यवस्था रहावे व गावातील नागरिकांचे पोलीस विभागात संबंधित कोणते कृत्य घडले असते पोलीस स्टेशन पर्यंत पोहोचविण्याचे काम पोलीस पाटील यांना अधिकार दिलेले असून गैरअर्जदार पोलीस पाटील हाऊस कुमार दिसेना आपल्या गैरवापर करून गावातील नागरिकांना सुद्धा दम देत असल्याने व फायनान्स कंपनी ची सुपारी घेऊन पोलीस पाटील या पदाचा स्वाक्षरीने गावातील नागरिकांना दमदाटी करीत असल्याने गावातील नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे . अर्जदाराने सुद्धा पोलीस पाटील या पोलीस पाटलाच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला आहे .अर्जदाराच्या जीवाला धोका झाल्यास याची संपूर्ण जबाबदारी पोलीस पाटील हौसकुमार बिसेन
व हेमराज बिसेन यांचे राहील. त्यामुळे पोलीस पाटलांवर तात्काळ कार्यवाही करण्यात यावी व तंटामुक्त अध्यक्ष यांनी पदाचा गैरवापर केल्यामुळे त्यांना पदावरून तात्काळ पदमुक्त करण्यात यावे . याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी गोंदिया उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन मुंबई यांना देण्यात आलेली आहे.