संजय गांधी निराधार लाभार्थ्यांना तीन हजार रुपये मानधन द्या :- आम आदमी पार्टी कोरपना ची मागणी
तालुका प्रतिनिधी :ग्यानीवंत गेडाम वरोरा
या महागाई च्या काळामध्ये संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना शासनाकडून जो एक हजार रुपयाची तटपुंजी रक्कम मिळते ही रक्कम परवडण्यासारखी नसुन लगतच्या तेलंगणा आणि दिल्ली सरकारच्या धर्तीवर 3 हजार रुपये तिथलं सरकार देते. दिल्ली पेक्षा चार पटीने जास्त कर महाराष्ट्र शासनाकडुन केंद्र सरकारला दिला जातो. तर अडचण काय असा प्रश्न उपस्थित करत संजय गांधी निराधार योजनेचे विधवा, घटस्फ़ोटीत महिला, अंध, अपंग, मुखबधीर, दुर्जर आजाराने ग्रस्त लोकांना तसेच, श्रावण बाळ योजनेचे लाभार्थीना दरमहिना 3000/- ( तीन हजार रुपये ) मासिक वेतन देण्यात यावे. श्रावणबाळ योजनेसाठी लाभार्थ्यांच्या वयाची अट 60 वर्ष करण्यात यावी. तसेच लाभार्थ्यांचे वार्षिक उत्पन्न 51 हजार करण्यात यावे. या मागणीला घेऊन आम आदमी पार्टी कोरपना च्या वतीने तालुकाध्यक्ष प्रतिक डाखरे यांच्या नेतृत्वात जिल्हाध्यक्ष सुनिल मुसळे, जिल्हा संघटन मंत्री राजेश बेले, जिल्हा कोषाध्यक्ष भीवराज सोनी, राजुरा विधानसभा प्रमुख प्रदिप बोबडे, बल्लारपूर शहरअध्यक्ष रवीकुमार पुप्पलवार, सोनल धोपटे, यांच्या मार्गदर्शनात कोरपना तहसिल कार्यालयाच्या समोर आंदोलन करण्यात आले. मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना तहसीलदार कोरपना यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी शुभम देवळकर, अक्षय पिंपळकर, प्रफुल कोल्हे, नितीन जगनाडे, राजकुमार गोरे, ईश्वर सोयाम, सौरभ तुरानकर, प्रेमचंद उमरे, प्रणय माहकुलकर, सिध्दार्थ कांबळे अनेक कार्यकर्ता उपस्थित होते.