ताज्या घडामोडी

आ.गुट्टे यांनी विधानसभा उपाध्यक्ष मा.नरहरी झिरवाळ यांची घेतली भेट

खरीप २०१८ हंगामातील दुष्काळाच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना मदत निधी व खरीप हंगाम २०२० चा मंजूर पिक विमा देण्याची केली मागणी

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

गंगाखेड विधानसभा
मतदारसंघाचे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी आज दि.२ फेब्रुवारी रोजी मुंबई येथे विधानसभा उपाध्यक्ष मा. नरहरी झिरवाळ यांची भेट घेऊन खरीप २०१८ हंगामातील दुष्काळाच्या अनुषंगाने बाधित शेतकऱ्यांना मदत निधी तात्काळ वितरित करण्यासह खरीप हंगाम २०२० चा पिंपळदरी व शेळगाव या मंडळांचा सोयाबीन पिकाचा पिक विमा,गंगाखेड व पालम तालुक्याचा तूर या पिकाचा पिक विमा मंजूर असतानाही रिलायन्स कंपनी तो शेतकऱ्यांना देण्यास टाळाटाळ करत आहे. मंजुर पिक विमा शेतकऱ्यांना तात्काळ वितरित करावा व तसेच यावर्षी अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या पिकासह घराचे व पशुधनाचे अतोनात नुकसान झाले असून पडझड झालेल्या घरांचे व दगावलेल्या पशुधनाच्या भरपाईपोटी शेतकऱ्यांना आर्थिक देण्याची मदत मागणी केली.
२०१८ मध्ये कमी पर्जन्यमान व पीक परिस्थिती बिकट असतानाही गंगाखेड तालुक्याचा समावेश करण्यात आला नाही. त्यामुळे केंद्र शासनाकडून मिळणाऱ्या बाधित शेतकऱ्यांना मदत निधीचा लाभ गंगाखेड तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळू शकला नाही.
गंगाखेड,पालम तालुक्यातील खरीप हंगाम २०२० चा तूर व सोयाबीन या पिकाचा मंजूर असलेल्या पिक विमा अद्याप शेतकऱ्यांना मिळाला नाही गंगाखेड वसंत पेठ तालुक्यातील शेतकऱ्यांचा सोयाबीन या मंजूर थकीत पिकविमा एकूण,१९,९६,४५,६७७ एवढा व तूर या पिकाचा ३०,२९,७८,१२७ असा एकूण पिक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ वर्ग करण्यात यावा व झालेल्या नुकसान भरपाईपोटी शेतकऱ्यांना आर्थिक मदत देऊन पिक विमा तात्काळ वितरीत करून शेतकऱ्यांना न्याय देण्यासंदर्भाची मागणी आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी केली.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close