ताज्या घडामोडी
तेंदुपत्याने भरलेला ट्रक वैनगंगा नदीत कोसळला
![](https://apnews.co.in/wp-content/uploads/2021/06/IMG-20210613-WA0116.jpg)
दोघांचा घटनास्थळी मृत्यू तर एक गंभीर जखमी
ग्रामीना प्रतिनिधी : महेश शेंडे विठ्ठलवाडा
अहेरी- चंद्रपूर या राष्ट्रीय महामार्गावर दिनांक 12 जून च्या मध्यरात्री MH-34 BG 6111 अहेरिकडून चंद्रपूरकडे जातं असलेला ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे आष्टी जवळील वैनगंगा नदीत उलटला. सदरील ट्रक अहेरीकडून तेंदुपत्ता भरून चंद्रपूरच्या दिशेने जात होते पण अचानक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे ट्रक हा विरुद्ध दिशेने जाऊन उलटला.या अपघातामध्ये चालक व कंडक्टर चा जागीच मृत्यू झाला असून अन्य एक जन गंभीर जखमी आहे.याच वैनगंगा नदीच्या दुसऱ्या बाजूला नवीन पुलाचे बांधकाम सुरू आहे,या बाजूला पिल्लर साठी खड्डे खोदून आहेत आणि तिथे दिवसरात्र मजूर काम करत असतात.याच दिशेने ट्रक कोसळला असता तर आणखी खूप जीवितहानी आणि वित्त हानी झाली असती.