फुटपाथवर राहात असलेल्या लोकांना दिले गरम कपडे

मुख्य संपादक:कु.समिधा भैसारे
चिमूर तालुक्यातील नेरी येथील रहिवासी असलेला तरूण सुनिल जनबंधु आपल्या कार्यात खुप गंभीरतेने काम करतांना दिसत आहेत, व समाजात आदर्श निर्माण केला आहे. त्यामुळे त्यांच्या कार्याची दखल घेतली जात आहे.
सुनिल जनबंधु हे चिमूर तालुक्यातील नेरी येथील रहिवासी असून त्यांनी स्थापण केलेली ” मातोश्री शकुंतला मनोहर जनबंधु बहूउद्देशिय संस्था” आहे. ते एक विशेष शिक्षक आहे. सध्या त्यांचा वास्तव्य नागपूर येथे आहे. ते त्यांनी स्थापन केलेल्या मातोश्री शकुंतला मनोहर जनबंधु बहूउद्देशिय संस्थेतर्फे गरिब, अनाथ, अपंग, विधवा, कुष्ठरोगी अशा लोकांसाठी समाजकार्य करतांना दिसत आहेत.
त्यांच्या मनात नेहमी काहीतरी करावं सुचत असते त्यामुळे त्यांनी संस्थेचे अध्यक्ष श्री. अनिल शेंदरे यांना घेऊन गरजूंसाठी पुण्याचे काम करतांना दिसतात.
सध्या थंडीचे दिवस असल्याने त्यांनी नागपूर येथे फुटपाथवर राहात असलेल्या लोकांना थंडी पासून बचाव करण्यासाठी गरम कपडे देण्यात आले.









