ताज्या घडामोडी
वाघाच्या हल्यात इसम ठार
चिमूर तालुक्यातील सावरगाव येथील घटना
ग्रामीण प्रतिनिधी: राहुल गहुकर
दिनांक.११/०७/२०२३ ला स्वतःच्या शेतात पती पत्नी पाऊस आल्याने शेतातील कामे करण्यासाठी गेले असता ईश्वर कुंभारे वय अंदाजे ४५ वर्षे राहणार सावरगाव येथील रहिवासी असून दबा धरून बसून असलेल्या पट्टेदार वाघाने हल्ला चढवून फस्त केल्याची घटना घडली याबाबत आरडा ओरड करीत पत्नीने गावकऱ्यांना सांगितले माहिती मिळताच वनविभागास याबाबत ची माहिती दिली. व तात्काळ वनविभागाने घटनास्थळी जाऊन शोध मोहीम सुरु केली. अखेर मृत ईश्वर कुंभारे यांचे प्रेत सापडले असून पुढील कारवाईस शव विच्छेदन करण्यासाठी उप जिल्हा रुग्णालय चिमूर येथे नेण्यात आले आहे.यावेळी बघ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणावर जमली होती.