ताज्या घडामोडी

आ.गुट्टे यांनी केंद्रीय मंत्र्यांची दिल्लीत घेतली भेट

गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांची माहिती देत गंगाखेड मतदार संघाकडे विशेष लक्ष देण्याची केली विनंती.

जिल्हा प्रतिनिधी :अहमद अन्सारी परभणी

दिनांक ३ ऑगस्ट मंगळवार रोजी गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री मा.ना. भागवत कराड व केंद्रीय रसायने आणि खते, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री मा.ना. भगवंत खुबा यांची दिल्ली येथे सदिच्छा भेट घेऊन केंद्रीय मंत्रिमंडळात निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.
काही दिवसापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार करीत काही जुने चेहरे कमी करून नवीन चेहऱ्यांना काम करण्याची संधी दिली. यात भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते डॉ. भागवत कराड यांना केंद्रीय अर्थ राज्यमंत्री विभागाची जबाबदारी दिली तर कर्नाटक बिदर लोकसभेतून निवडून आलेले मा.ना. भगवंत खुबा यांच्याकडे केंद्रीय रसायने आणि खते, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री पदाची जबाबदारी दिली आहे. सदरील दोन्ही केंद्रीय मंत्र्यांची आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी आज दिल्ली येथे सदिच्छा भेट घेऊन मतदार संघातील विकास कामाबाबत चर्चा केली.
केंद्रीय रसायने आणि खते, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री मा.ना. भगवंत खुबा यांच्याशी गंगाखेड विधानसभा मतदार संघातील शेतकऱ्यांना रासायनिक खते, बी-बियाणे व औषधांची भेडसावणारी समस्या या बाबतीत सविस्तर चर्चा करून योग्य तो तोडगा काढण्याची आ.गुट्टे यांनी विनंती केली तर केंद्रीय अर्थ राज्यमंत्री मा.ना. भागवत कराड” यांना गंगाखेड विधानसभा मतदार संघात होत असलेली विविध विकास कामे व भविष्यात करावयाच्या विकास कामांची माहिती दिली असता विकास कामाबाबतीत मी सदैव आपल्या सोबत असल्याचे केंद्रीय मंत्र्यांनी यावेळी आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांना आवर्जून सांगितले असल्याचे अधिकृत सूत्रांकडून समजले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close