ताज्या घडामोडी
सुनिल रामटेके यांचा राजू-यात माजी आमदार वामनराव चटप यांच्या हस्ते सत्कार
प्रतिनिधीःरामचंद्र कामडी
विदर्भ पटवारी संघ नागपूर उपविभाग शाखा राजूराचे पटवारी सुनिल रामटेके यांची राजूरा उपविभाग पटवारी संघटनेच्या उपाध्यक्षपदी अविरोध निवड झाल्याबद्दल चंद्रपूर जिल्हा पटवारी संघटनेच्या अनेक सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले असून माजी आमदार तथा शेतकरी संघटनेचे जेष्ठ व झुंजार नेते, माजी आमदार ॲड. वामनराव चटप यांच्या हस्ते नुकताच त्यांचा राजूरा मुक्कामी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी माजी नगराध्यक्ष रमेश नळे, शेषराव बोंडे, कपिल इद्दे, महेेश रेगुंडवार, माजी नगरसेवक भाऊजी कन्नाके, मधुकर चिंचोलकर,उत्पल गोरे, सहज सुचलच्या सदस्या रजनी सुनिल रामटेके व शहरातील अन्य मान्यवरगण उपस्थित होते.