पालम शहरातील राष्ट्रीय महामार्ग 361एफ वर पडलेले खड्डे बुजविण्यासाठी ‘एम.आई.एम पक्षाच्या पाठपुराव्याला यश
जिल्हा प्रतीनिधी:अहमद अन्सारी परभणी
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षातर्फे दिनांक 24/09/2021 रोजी पालम तहसीलदार मार्फत राष्ट्रीय महामार्ग विभाग श्रेणी क्रमांक 1 पालम येथे निवेदनाद्वारे मागणी करून राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे त्वरित बुजवण्यात यावे अन्यथा गांधी जयंती निमित्त दिनांक 02/10/2021 रोजी पालम तहसील कार्यालय जवळ धरणे आंदोलन करणार आहे असे निवेदनाद्वारे कळविले होते.पालम येथे पोलीस स्टेशन येथे साने साहेब,व बेद्रे साहेब यांनी मध्यस्थी करून संबंधित 1) राष्ट्रीय महामार्ग विभाग श्रेणी क्रमांक 1 व 2) उपविभागीय अधिकारी सा.भा.उपविभाग गंगाखेड/पालम यांनी लेखी लिहून दिले की आठ दिवसात व लवकरात लवकर खड्डे बुजवले जातील.दिनाक 18/10/2021 रोजी संबंधित गुत्तेदार तात्पुरत्या स्वरूपात खड्डे बुजवून घेत असल्याने एम.आई.एम पक्षाच्या पाठपुराव्याला यश आले आहे.एम.आय.एम पक्षाने यशस्वी पाठपुरावा करून खड्डे बुजवून घेतल्याने पालम शहरात शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
प्रतिक्रीया : –
राज्य महामार्ग क्रमांक 249,235 वरील उर्वरीत खड्डे व रस्त्याचे डांबरीकरणाचे व सिमेंट काॅक्रेटीचे काम संबंधित विभागाने लवकरात लवकर नाही केले तर पुन्हा एम.आय.एम.पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात येईल.
अनीस भाई खुरेशी
एम.आय.एम पालम तालुका प्रभारी अध्यक्ष