ताज्या घडामोडी
दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर गाईच्या पोटातून वासराला काढले बाहेर

तालुका प्रतिनिधी:महेश शेंडे गोंडपिपरी
गोंडपीपरी तालुक्यातील धामनगाव येथील शेतकरी बंडू कुकुडकर यांच्या मालकीची गाय गाभण राहिली, वासराला जन्म देण्याचा कालावधीजवळ आला मात्र गाईने वासराला जन्म न दिल्याने पशुमालकाची चिंता वाढली याबाबतची माहिती पशु वैद्यकीय डॉक्टर मिलन लांबाडे यांना देण्यात आली असता गायीवर कोणतीही शस्त्रक्रिया न करता केवळ पशुवैद्यकीय शिक्षण व अनुभवाच्या जोरावर वैद्यकीय डॉक्टर मिलन लांबाडे यांनी मोठ्या शिताफीने गाईच्या पोटातून वासरू बाहेर काढले.
याकरिता तब्बल दोन तासाच अवधी लागल्याचे लांबाडे यांनी सांगितले.
कोणतीही शस्त्रक्रिया न करता तब्बल दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर गायीच्या पोटातून वासराला सुखरूप बाहेर काढल्याने पशु वैद्यकिय डॉक्टर मिलन लांबाडे यांच्या कार्याचे उपस्थितांसह गावकर्यांनी कौतूक केले.