ताज्या घडामोडी
zp.p.s. उर्दू शाखा मानवत येथे विज्ञान दिन साजरा
जिल्हा प्रतिनिधी : अहमद अन्सारी परभणी
भारतीय भौतिकशास्त्रज्ञ सर सी. व्ही. रमण यांनी 28 फेब्रुवारी 1928 रोजी रमन प्रभावाचा शोध लावला म्हणून दरवर्षी 28 फेब्रुवारी रोजी भारतात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो. त्यांच्या शोधासाठी सर सी.व्ही. रमण यांना 1930 मध्ये भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले. म्हणुन आजचा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणुन साजरा केला जातो. मानवत येथे zp.p.s. उर्दू शाखा क्रमांक 1 मध्ये विज्ञान दिन साजरा करण्यात आला. यावेळी एच एम अन्सारी अजीज आणि फौजिया नसरीन मॅडम व विद्यार्थी उपस्थित होते.