डॉ.संतोष मुंडेंच्या नेतृत्वाखाली 5 ते 6 हजारपेक्षा जास्त लोकांचे विराट आंदोलन
दिव्यांग, विधवा, परित्यक्ता ज्येष्ठ नागरिक यांना न्याय देण्यासाठी गांधीगिरी करूच वेळ आली तर करू भगतसिंगगिरी : डॉ. संतोष मुंडे
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
दिव्यांग, विधवा, परित्यक्ता ज्येष्ठ नागरिक यांना लाभ मिळवून देणाऱ्या योजनांची अंमलबजावणी होत नसल्याने या घटकांचे प्रश्न प्रलंबित आहेत. अशा घटकांच्या विविध मागण्यांसाठी परळी तहसील कार्यालयावर सोमवार, २६ डिसेंबर रोजी दिव्यांगाचे कैवारी तथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे यांच्या नेतृवाखाली आणि माजी मंत्री आ. धनंजय मुंडेंच्या मार्गदर्शनाखाली पाच ते सहा हजारपेक्षा अधिक नागरिकांनी विराट आंदोलन केले.
याप्रसंगी बोलताना दिव्यांग, विधवा, परित्यक्ता ज्येष्ठ नागरिक यांना न्याय देण्यासाठी गांधीगिरी करूच वेळ आली तर भगतसिंगगिरी करू असे प्रतिपादन यावेळी बोलताना डॉ. संतोष मुंडे यांनी केले. आंदोलनातील विविध मागण्या पुढीलप्रमाणेवरील; १. वरील सर्वांना अंत्यादोयामध्ये (2 रू. प्रति किलो गहू व 3 रुपये प्रति किलो तांदूळ) समावेश करून घ्यावा. २. तहसीलद्वारे या घटकांना देण्यात येणाऱ्या पगारी नियमित करणे तसेच त्यात कमी जास्त न करणे. ३. वरील घटकांना सरसकट घरकुल देण्यात यावे. ४. नगर परिषद, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद यांचा वरील घटकांसाठी राखीव असलेला ५% निधी नियमित वाटप करावा. ५. दिव्यांगांना यु पी आय डी कार्ड घरपोच देण्यात यावे. ६. रेशन कार्ड ऑनलाइन करून देणे व फाटलेल्या रेशन कार्ड बदलून देणे. या अंदोलनात दिव्यांग, विधवा, परित्यक्ता, जेष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले आहेत.
दिव्यांग, विधवा, परित्यक्ता ज्येष्ठ नागरिक यांच्या विविध प्रश्नांसाठी डॉ. संतोष मुंडेंनी आयोजित केलेल्या मागण्या बाबत तहसील प्रशासनाने चर्चे दरम्यान सकारात्मक प्रतिसाद देत जागीच मागण्या मान्य केल्या. तहसील प्रशासनाच्यावतीने नायब तहसीलदार बाबुराव रुपनर यांनी निवेदन स्वीकारले. डॉ संतोष मुंडे ज्या ज्यावेळी अंध,अपंग, निराधार, परित्यक्ता महिलांच्या समस्या मांडतात, त्या समस्या आम्ही तातडीने सोडवण्याचा प्रयत्न करतो,त्याला सकारात्मक प्रतिसाद देतो, इथून पुढे ही या सर्व समस्या तात्काळ सोडवण्याचा प्रयत्न करु. असे सांगितले आहे. तहसील येथील भव्य अंदोलनास बाळासाहेब देशमुख, जानेमिया कुरेशी, सोफिया नंबरदार, के डी उपाडे, दत्ता सावंत, सचिन मुंडे, शंकर कापसे सय्यद सिराज, मनजीत सुगरे, नागनाथ मुंडे, विठ्ठल साखरे, देवानंद दहिफळे आदीनी अंदोलनास भेटी देऊन पाठींबा दिला. यावेळी डॉ.संतोष मुंडे यांच्यासह साजन लोहिया, सय्यद सुभान, संतोष आघाव, नागनाथ सावजी, विलास काळूंखे, अशोक सोनवणे, रंगनाथ तोंडे, शेख फेरोज, अनंतराव लोखडे, अशोक गंडले, अनंत बापु मुंडे, उध्दव फड, माणिक जाधव, संजय नखाते, संदेश कापसे, लतीफ कुरेशी, विष्णू अरसुळे, विष्णू शेप, विलास रुद्रवार, नागरगोजे आशा, सरताज खान, विष्णू आघाव, शिवाजी चाटे, नानासाहेब मुंडे, शेख रहिम, आसेफ खान, निलाबाई भद्रे, पुष्पा कांबळे,दत्ता कराड, दिलीप भेंडेकर, अल्लाउद्दीन शेख, सुधाकर फड, जीवन सातभाई, केशव फड, रंजित रायभोळे, नंदकुमार जोशी, प्रदिप भोकरे, शेख सिंकदर, रामेश्वर जाधव, मनोज नाथानी, राम वलवार, विमल धुमाळ, अरिहंत लोढा, विमल निलंगे, दत्ता काटे, अविनाश फड, धनश्री वेताळ, शेख मिया, संतोष बल्लाळ, अभिजीत जगतकर, चंद्रकात होलबोले, महादेव राऊत, बालाजी शहाणे, सर्जेराव कुभार, दिगंबर सरवदे, प्रमोद आबाळे , कपिल जाजू, तुळशिराम प्रयाग, महेबुब पठाण, योगीराज दुर्गे, विशाल चव्हाण, सुरेश माने,शिवाजी माने, शेख हबीबभाई, शेख मुबारक, विजय भोयटे, गोपाल बाराड, पठाण आसेफखान, शेख जावेद, खान युनूस, सुनीता कवले, उषा आघाव, विमल निलगे, ममता बद्दर, उत्तरेश्वर सोळंके, राजकुमार प्रधान, राम भोळे, दगडू भाले, शेख खडूस, कराड पार्वती, अमोल गोलहार, मयूर शिंदे, सदाशिव शिदे, दीपक पारधे, सोमनाथ गित्ते, शेषराव गित्ते व दिव्यांग, विधवा, ज्येष्ठ नागरिक, आणि माजी सैनिक संघटना आदी उपस्थित होते.