ताज्या घडामोडी

पाथरीत शेतकरी आंदोलनाला तिस-या दिवशी वाढता पाठिंबा;हालगी नाद आंदोलन

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

परतीच्या पावसाने कहरच केला रविवारी दिवसभर अधून मधून मुसधारे नंतर रात्री च्या सुमारास तालुक्याच्या अनेक भागात ढगफुटी सारखा पाऊस झाल्याने तहसील समोर आंदोलनाला बसलेल्या शेतक-यांना सोमवारी तिस-या दिवशी पुन्हा वाढता पाठिंबा मिळाल्याचे चित्र पहावयास मिळाले या वेळी आंदोलक शेतक-यांनी हलगी नाद करत प्रशासनाचे लक्ष वेधले.
पाथरी तालुक्या पाऊस थांबण्याचे नाव घेत नाही.१४ ऑक्टोबरच्या अतिवृष्टी नंतर शनिवार १५ ऑक्टोबर ला सुर्यदर्शन झाल्याने शेतकरी चिखलातच सोयाबीन चे पांगलेले पाण्यातील घावले (ढिग) जमा करुन ढिग घालत होते तर काही जन चिखल तुडवत सोयाबीन रस्त्यावर आणून टाकत होते. मात्र पुन्हा रविवारी दिवसभर आणि रात्री जवळपास दिड ते दोन तास पुन्हा परतीच्या पावसाने संपुर्ण तालुका पुन्हा झोडपुन काढला.
सतत परतीचा पाऊस झोडपुन शेतक-यांच्या खरीपातील कापुस,तुर,सोयाबीनचेच नाही तर त्यांच्यांच्या स्वप्नांचा ही चुराडा करून टाकला आहे. चार दिवसावर आलेली दिपावली कशी साजरी करावी लेकीबाळी आनाव्या की नाही या चिंतेत शेतकरी वर्ग दिसत आहे.
शनिवारी महाविकास आघाडीच्या तीन्ही पक्षाच्या युवाशाखेच्या पदाधिका-यांनी तात्काळ ओला दुष्काळ जाहिर करून शेतक-या तातडीने दिपावली पुर्वी नुकसान भरपाई सह विमा देण्याच्या मागणी साठी पाथरी तहसील समोर तालुक्यातील शेतक-यां सह उपोषण सुरू केले आहे. रविवारी दिवसभर हे उपोषणकर्ते पावसात भिजत होते तर रात्री पडत्या पावसात संपुर्ण भिजलेल्या कपड्यांनी रात्रभर जागर करत उपोषण सुरूच ठेवले होते.
सोमवारी याचे चित्रिकरण सोशल मिडियात व्हायरल झाल्या नंतर आपलेल पुत्र,भाऊ आपल्याला मदत मिळावी या साठी दोन दिवसा पासुन पडत्या पावसात उपोषण करत असल्याचे पाहून सोमवारी या आंदोलनात तालुक्यातील अनेक शेतकरी सहभागी झाल्याचे पहावयास मिळाले. या ठिकाणी महामार्गा लगत तहसील समोर जागा कमी असल्याने आंदोलक आजुबाजुच्या रिकाम्या जागेत बसुन आहेत.
रविवारी पालमंत्री ना तानाजी सावंत यांनी आंदोलक शेतक-यांंशी संवाद साधून ही त्यांचे समाधान झाले नाही. पालकमंत्र्यांनी हा विषय कॅबिनेट मध्ये ठेवतो असे सांगुन ही आंदोलकांनी माघार घेतली नाही.ते त्यांच्या मागणीवर ठाम राहिले.
सोमवारी सकाळी पुन्हा शांततेत आंदोलन सुरुच ठेवत विकविमा आणि ओला दुष्काळ जाहिर करा नुकसान भरपाई दिपावली पुर्वी द्या म्हणत हालगी नाद करत प्रशासनाचे लक्ष वेधले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close