ताज्या घडामोडी

पाणी प्रश्नावर मनसे आक्रमक वरोरा नगराध्यक्ष यांना मनसे चे निवेदन

तालुका प्रतिनिधी:ग्यानीवंत गेडाम वरोरा

मनसेचे सरचिटणीस हेमंत गड़करी,विद्यार्थी सेना प्रदेश उपाध्यक्ष मंगेश डुके,मनदीप रोड़े शहर अध्यक्ष मनसे चंद्रपुर यांच्या मार्गदर्शनात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने वरोरा नगर परिषद अध्यक्ष यांना पानी प्रश्नावर निवेदन सादर केले. वरोरा शहरात गेल्या कित्येक दिवसांपासून नगर परिषद मार्फ़त जनतेला जो पाणी पुरवठा होत आहे.ते पाणी पुर्णपणे दुषित असून पिण्यायोग्य नाही. परीणामी वरोरा शहरात दुषित पाणी पुरवठा होत आहे.हे पाणी जनतेच्या आरोग्यावर विपरीत परिणाम करीत आहे. जनतेचे आरोग्य धोक्यात टाकण्याकरिता कारणीभूत आहे.जे पानी पिण्याकरिता पुर्ण पने योग्य नाही, त्यामुळे मुळे वरोरा शहरात ड़ेंगूचे रुग्ण अतिशय जोरात वाढत आहे,नगरपालिका ने बनविलेले प्रभागा प्रभागात लावलेल्या फिल्टर मधून सुधा अळ्या असलेले पाणी जनतेस मिळत आहे,हे पूर्णता जनतेच्या जीवनाशी खेळण्याचा प्रकार चालू आहे आणि हा खेळ मनसे खपऊन घेणार नाही, येत्या आठ दिवसात जनतेला शुद्ध व चागले पाणी मिळाले नाही तर मनसे तेच अशुद्ध पाणी नगर परिषद अधिकारी यांना पाजण्यासाठी मागेपुढे पाहणार नाही, व नगर पालिका समोर मनसे पद्धतीने ठिय्या आंदोलन करील याची दक्षता नगर परिषद ने घ्यावी ,जनतेच्या जीवनाशी आम्ही प्रशासनाला खेळु देणार नाही. नगराध्यक्ष यांना निवेदन देताना मनसे पदाधिकारी
प्रशांत जुंजारे जिल्हा उपाध्यक्ष मनवीसे,
गौरव मेले तालुका अध्यक्ष
आकाश काकड़े मनसैनिक
हर्षल डोंगरे मनसैनिक
ओम चिकनकर,मनीष वासुलकर ,आनंद गेडाम,सत्या मांडवकर,चेतन बुच्चे,रोहित केशववार,पृथ्वी पूरी ईत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close