ताज्या घडामोडी

जेष्ठ पत्रकार श्री.भाऊसाहेब मंडलिक यांच्या पत्नी कै.रत्नप्रभा मंडलिकताई यांच्या दुःखद निधनानंतर “महसूलमंत्र्यांची” त्यांच्या उंचखडक बुद्रुक येथील निवास्थानी सांत्वनपर भेट

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

महाराष्ट्र राज्याचे महाविकास आघाडीचे महसूलमंत्री माननीय नामदार श्री.बाळासाहेब थोरातसाहेब यांनी आज उंचखडक बुद्रुक येथील अकोले तालुक्यातील जेष्ठ पत्रकार श्री.भाऊसाहेब मंडलिक यांच्या पत्नी कै.रत्नप्रभा मंडलिकताई यांच्या दुःखद निधनानंतर त्यांच्या निवास्थानी सांत्वनपर भेट दिली. याप्रसंगी श्री सद्गुरु यशवंतबाबा चैरिटेबल ट्रस्टचे उपाध्यक्ष तसेच अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे जेष्ठ संचालक माननीय श्री.अशोकराव देशमुख यांनी थोरासाहेबांच्या श्री क्षेत्र राममाळ येथे साहेबांच्या माध्यमातुन झालेल्या कामांना उजाळा दिला.

उंचखडक बुद्रुक ग्रामस्थांच्या वतीने प्रातिनीधीक स्वरुपात अशोकराव देशमुख,प्रतापराव देशमुख, भाऊसाहेब खरात यांच्यावतीने साहेबांचा सन्मान करण्यात आला याप्रसंगी अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक तसेच जिल्हा नियोजन समितीचे सदस्य माननीय श्री.मधुभाऊ नवले , अकोले काँग्रेस तालुकाध्यक्ष दादापाटील वाकचौरे,सोन्याबापु वाकचौरे,बाळासाहेब नाईकवाडी,मिनानाथ पांडे,रमेशआण्णा जगताप,शंकरराव वाळुंज,शिवाजीराजे नेहे, विक्रमभाऊ नवले,प्रदिपराज नाईकवाडी,अनिलजी वैद्य आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन उंचखडक बुद्रुक ग्रामपंचायतचे कार्यक्षम उपसरपंच तसेच बुवासाहेब नवले मल्टी स्टेटचे संचालक महिपाल देशमुख(बबनदादा) यांनी केले याप्रसंगी मोठ्या संख्येने उंचखडक ग्रामस्थ उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close