मानवत एम.आय.एम.च्या तालुकाध्यक्षपदी मोहम्मद मुस्ताक यांची निवड

एम.आय.एम.चे मराठवाडा अध्यक्ष फिरोज लाला यांची प्रमुख उपस्थिती.
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
मानवत येथे दिनांक ५ ऑक्टोंबर शनिवार रोजी जिल्हाध्यक्ष अँड. इम्तियाज खान यांच्या स्वाक्षरीने मानवत शहरातील समाजसेवक गोरगरिबांचे कैवारी सर्वांच्या मदतीला धावून जाणारे मोहम्मद मुस्ताक मोहम्मद अक्रम शेख उर्फ अल्लारखा यांची मजलिसे इतेहादुल मुस्लिमीन एम.आय.एम.च्या तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
सविस्तर वर्त असे की. दिनांक ५ ऑक्टोंबर रोजी हजरत टिपू सुलतान चौक येथे येणाऱ्या प्रमुख पाहुण्यांचा पुष्पहार फटाक्याची आतिषबाजी ढोल ताशांच्या गजरात त्यांचा सत्कार करण्यात आला व हजरत टिपू सुलतान चौक येथून बांगड प्लॉट मार्गाने अक्सा मंगल कार्यालय पर्यंत पायी रॅली काढण्यात आली या रॅलीचे चे रूपांतर संवाद मिळाव्यात झाली या संवाद मेळाव्याचे अध्यक्ष एम .आय. एम. चे मराठवाडा अध्यक्ष फिरोज लाला यांना करण्यात आले तर प्रमुख पाहुणे एम. आय .एम. चे जिल्हाध्यक्ष अँड. इम्तियाज खान, ज्येष्ठ नेते हाफेज अलीशेर कुरेशी, पाथरी विधानसभा उपाध्यक्ष यासीन इनामदार, परभणी शहर उपाध्यक्ष खाजा अशरफोद्दिन, मानवत येथील युवा नेते हाजी रफिक भाई कुरेशी, यांच्यासह एम आय एम पक्षाचे पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.
या संवाद मेळाव्यात जमलेल्या जनसमुदायांना अँड इम्तियाज खान यांनी आपले मनोगत व्यक्त केले व म्हणाले की एम .आय. एम. पक्षाचे खासदार बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी मुस्लिम समाजाचे कोणत्याही समस्यावर ठामपणे उभे राहून बोलतात व त्याच प्रकारे देशातील सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन चालतात.
मराठवाडा अध्यक्ष फिरोज लाला यांनी आपले मनोगत व्यक्त केले होते म्हणाले की एम .आय. एम. पक्षहे सर्व जाती धर्मांच्या हक्कांसाठी लढणारा एकमेव पक्ष आहे.
मुसलमानांचे सगळ्यांत जास्त प्रश्न खासदार बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी यांनी उचललेले आहेत “गेल्या पाच वर्षांत संसदेत जे निर्णय झाले आणि बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसींनी त्या निर्णयांचा विरोध केला मुस्लिमांचा आवाज मजबूत करणारे हे एकमेव नेते आहेत.
प्रमुख पाहुण्याचे भाषण झाल्यानंतर मोहम्मद मुस्ताक उर्फ अल्लारखा यांना ए. आय .एम. आय. एम. तालुका अध्यक्ष पदाचे नियुक्तीपत्र मराठवाडा अध्यक्ष फिरोज लाला परभणी जिल्हा अध्यक्ष अँड. इम्तियाज खान ज्येष्ठ नेते हाफेस अलीशेर कुरेशी यांच्या हस्ते देण्यात आले.तालुका अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर विविध सामाजिक संघटनांकडून मोहम्मद मुस्ताक उर्फ अल्लारखा यांचे सत्कार ही जोरदार करण्यात आले..
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शगीर खान यांनी केले तर आभार प्रदर्शन तालुका अध्यक्ष मोहम्मद मुस्ताक उर्फ अल्लारखा यांनी मानले या संवाद मेळाव्यामध्ये शहरातील नागरिक व युवक मोठ्या संख्येने उपस्थिती होती या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी मुस्ताक भैया मित्र मंडळ यांच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.