श्री. सीतारामजी कुंटे यांचा श्री साईबाबांची मूर्ती देऊन सत्कार
जिल्हा प्रतिनिधी : अहमद अन्सारी परभणी
पाथरी येथील श्री साईबाबा विकास आराखड्याच्या सुधारित मंजुरीसाठी आज मंत्रालयात बैठक झाली. यानिमित्त राज्याचे मुख्य सचिव श्री. सीतारामजी कुंटे यांचा संत श्री साईबाबांची मूर्ती देऊन सत्कार केला.
पाथरी साई जन्मभूमी मंदिर व परिसराचा विकास व्हावा यासाठी आपण अनेक वर्षांपासून प्रयत्नशील आहोत. साईबाबा मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखडा परभणी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत शासनाला सादर करण्यात आला होता. यानंतर मी या कृती आराखड्यास मंजुरी मिळवण्यासाठी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता. त्यानंतर त्यावर आज मंत्रालयात मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करीत करण्यात आलेल्या उच्चाधिकार समितीची बैठक संपन्न झाली.
सदर बैठकीत विविध बाबींवर सकारात्मक चर्चा झाली असून यावरील प्रस्ताव सन्माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे सादर करण्यात येणार आहे. लवकरच या आराखड्यास मंजुरी मिळणार आहे. परिणामी मागील अनेक वर्षांपासून रखडलेला श्री साईबाबा जन्मभूमी तिर्थक्षेत्राचा विकास साधला जाणार आहे.
बैठकीस वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव, अप्पर मुख्य सचिव(नियोजन), राज्याचे पोलीस महासंचालक, नगरविकास विभागाचे वरिष्ठ अधिकारी, परभणी जिल्हाधिकारी, पाथरी नगरपरिषद मुख्याधिकारी व इतर अधिकारी उपस्थित होते.