जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांची वसुंधरा पायी दिंडी वारी
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
माऊली माहेर उपपीठ सिमुरगव्हाण पाथरी जिल्हा परभणी येथून जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांची वसुंधरा पायी दिंडी वारी नानीजधाम येथे जाण्यासाठी आज पहिल्या दिवशी मुक्कामी देवनांद्रा शाळा येथे होती
या पायी दिंडी वारी सोहळ्यात पर्यावरण संरक्षण साठी संदेश देत हा दिंडी सोहळा 23 व्या दिवशी नानीज येथे पोहचणार आहे विशेष म्हणजे या दिंडी सोहळ्यात पर्यावरणाबद्दल ची वसुंधरा देते निवारा फक्त प्रदूषण आवरा असे विविध बोर्ड या दिंडी सोहळ्यामध्ये पाहायला मिळालें तसेच दिंडीमध्ये स्वच्छता शिस्त इत्यादी गोष्टी पाहायला मिळाल्या व व्यवस्थापनाचे कार्य सुद्धा उल्लेखनीय होते या दिंडी सोहळ्यामध्ये स्वामीजींचे भक्तगण महिला व पुरुष हे खूप मोठ्या संख्येने दिसून आले तसेच या सोहळ्यासाठी महा आरती व महाप्रसाद ला उपस्थित राहून सेवा करतांना माजी सभापती दादासाहेब काका टेंगसे,पीठ प्रमुख लोणारे आबा,पीठ व्यवस्थापन समिती अध्यक्ष बाबासाहेब नायकल,पीठ दिंडी प्रमुख अरविंद मोरे,जिल्हाध्यक्ष रोहिदास टेंगसे,सुनील नायकल,बापूराव गोंगे, अक्षय कम्प्युटरचे तुकाराम पोळ व दैनिक धर्मयोद्धा चे पत्रकार मुरलीधर गोंगे आदी भक्तगण उपस्थित होते .