त्रिपुरातील घटनेचा पाथरीत बहुजन क्रांती मोर्चा व सहयोगी संघटनांकडून निषेध
बहुजन क्रांती मोर्चा व राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा च्या वतीने देशभरात धरणे प्रदर्शन केले.
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
त्रिपुरातील मुस्लीम समाजावर होणारे हल्ले थांबवावे, दोषीवर कारवाई करण्यात यावी,तसेच त्रिपुरा येथे राष्ट्रपती राजवट लागू करावे या मागणीला घेऊन बहुजन क्रांती मोर्चा आणि राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा व सहयोगी संघटनेच्या वतीने सोमवारी पाथरी तहसील कार्यालय येथे तहसीलदार यांना याबाबत चे निवेदन दिले.बहुजन क्रांती मोर्चाने निवेदनात म्हटले आहे की त्रिपुरामध्ये मुस्लिमावर आणि त्यांच्या धार्मिक स्थळांच्या मशिदीवर हल्लेखोरांकडून हल्ले होत आहेत. मशिदीमध्ये जाळपोळ मुस्लिम स्त्री-पुरुषांवर अत्याचार, छळ त्यांच्या घरांची आणि औद्योगिक प्रतिष्ठानाची तोडफोड करून त्यांच्या मालमत्तेचे नुकसान होते. त्रिपुरातील मुस्लिम समाजावर होणारे हल्ले थांबवावेत,हल्ल्यात मुस्लिमांच्या मशिदी आणि मालमत्तेचे झालेल्याना नुकसान भरपाई द्यावी. दंगलखोरांवर कडक कारवाई करावी, “मायनॉरिटी ॲट्रॉसिटी ॲक्ट” लागू करावा, आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे. यावेळी बहुजन क्रांती मोर्चा चे पाथरी तालुका संयोजक नितीन कांबळे, राष्ट्रीय अत्याचार निवारण शक्ती(नफ) चे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष एड. हर्षवर्धन नाथभजन, जमाते-ए-इस्लामी हिंद चे परभणी जिल्हा अध्यक्ष प्रा.मोहम्मद शफी यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. तसेच कुल जमाते तंजीम पाथरी चे तालुकाध्यक्ष मौलाना कमरूद्दिन,संविधान सुरक्षा आंदोलन चे जिल्हाध्यक्ष शेख खुर्शिद,छत्रपती क्रांती सेनेचे ता.कार्याध्यक्ष माधव कदम पाटील,बहुजन मुक्ती पार्टी चे शहर अध्यक्ष नवनाथ कांबळे, एम आय एम चे मुजीब आलम,भारतीय विद्यार्थी मोर्चा चे सचिन कांबळे, भारत मुक्ती मोर्चा,राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ शाखा पाथरी,लहुजी क्रांती मोर्चा इत्यादी सामाजिक व राजकीय संघटनांनी निषेध व्यक्त केला.