नेरी येथे भव्य मोफत रोग निदान व होमिओ पेॅथिक औषधोपचार शिबिर
ग्रामीण प्रतिनिधी:रामचंद्र कामडी नेरी
होमिओपॅथिक शास्त्राचे आद्य जनक डॉ.सॅमुअल यांच्या 267 व्या जयंतीनिमित्त दिनांक 10 एप्रिल 2022 रोजी श्री राष्ट्रसंत तुकडोजी सभागृह, ग्रामपंचायत समोर,नेरी येथे सकाळी 9 ते दुपारी एक वाजेपर्यंत नॅशनल अकॅडेमी ऑफ होमिओपॅथी ब्रह्मपुरी, जे. एन .एस. हेल्थकेअर नागपूर तथा जे व्ही एस फार्मा कंपनी दिल्ली यांचे संयुक्त विद्यमाने व चिमूर तालुक्यातील होमिओपॅथी चिकित्सक यांच्या सहकार्याने भव्य मोफत रोगनिदान व होमिओपॅथिक औषध उपचार शिबिराचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा चिमूर गडचिरोली लोकसभा क्षेत्राचे लाडके व लोकप्रिय खासदार अशोकजी नेते, चिमुर विधानसभा क्षेत्राचे आमदार कीर्तिकुमार भांगडीया, डॉ. सोमनाथ गोसावी(प्रशासक महाराष्ट्र काॅन्सिल ऑफ होमिओपॅथी, मुंबई), डॉ. मोहम्मद अली जीवानी (प्रसिद्ध रेडिओलॉजिस्ट ,ब्रह्मपुरी), डॉ.डी. बी. चौधरी (माजी सदस्य सी. सी. एच. दिल्ली), नितीन जोथसिंग(एम. डी., जे. व्ही. एस. फार्मा, दिल्ली), जितेंद्र श्रीवास्तव (जे. एन. एस. हेल्थकेअर, नागपूर), गोपाल केडिया (रीजनल सेल्स मॅनेजर, जे. एस. फार्मा), डॉ. श्यामजी हटवादे नेरी, डॉ. प्रभुदास चिलबुले ब्रह्मपुरी यांच्या उपस्थितीत व करकमलाने संपन्न होत आहे.
या शिबिरात लहान मुले, तरुण ,तरुणी स्त्रिया ,प्रौढ व वयस्कर रुग्णांवर औषधोपचार केले जातील .जसे त्वचारोग, खाज, खरुज, गजकर्ण, इसबगोल, मुरूम, पित्त, शरीरावर येणाऱ्या गाठी ,स्त्रियांचे आजार _पाळी न येणे , अनियमितमासिक पाळी किंवा जास्त प्रदरस्त्राव, पाळी बंद झाल्याने होणारे दुष्परिणाम, मुले-मुली वयात येतानाचे आजार ,पोटाचे आजार, मलबद्धता ,अॅसिडिटी, मुळव्याध ,भगंदर, अल्सर, काविळ ,किडनी आजार, निद्रानाश, मिर्गी, दमा, वारंवार होणारा जुनाट सर्दी खोकला ,नाकातील अर्यूद, वारंवार होणारी रक्ताची कमतरता ,केस गळणे व पिकणे इत्यादी तसेच तंबाखू, गुटखा ,सिगारेट ,अल्कोहोल यांचे सेवन व त्यामुळे होणारे दुष्परिणाम इत्यादी रोगाचे निदान व औषध उपचार होणार आहे. तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले आहे. शिबिराला अॅकडेमीचे तज्ञ डॉक्टरांची उपस्थिती राहणार असून त्यांचे द्वारे औषधोपचार व मार्गदर्शन करण्यात येईल तरी जास्तीत जास्त रुग्ण बांधवांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आव्हान अध्यक्ष डॉ. श्यामजी हटवादे व सचिव डॉक्टर प्रवीण झाडे यांनी केलेले आहे.