ताज्या घडामोडी

वाघाळा जि प शाळेचे तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत घवघवीत यश

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

जिल्हा क्रीडा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली गटशिक्षणाधिकारी कार्यालय पाथरी व तालुका क्रीडा समिती पाथरी यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक २४ नोव्हेंबर गुरूवार रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासापुरी या ठिकाणी आयोजित केलेल्या तालुकास्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेमध्ये जिल्हा परिषद प्रशाला वाघाळा येथील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून नेत्रदीपक कामगिरी केली.
या विविध स्पर्धेमध्ये १७ वर्षा खालील मुलांच्या गटात गोळा फेक प्रकारात रजत सुशील घुंबरे
प्रथम, थाळीफेक प्रकारात रजत सुशील घुंबरे प्रथम, लांब उडी प्रकारात रजत सुशील घुंबरे तृतीय,१४ वर्षाखालील मुलांच्या गटात पृथ्वीराज चव्हाण गोळा फेक प्रकारामध्ये प्रथम, मुलींच्या गटात थाळीफेक मध्ये सुमन चव्हाण प्रथम, लांब उडी मध्ये आयमन अब्बास पठाण द्वितीय, गोळा फेक प्रकारात सुमन शंकर पवार प्रथम, व राधिका अंबुरे द्वितीय, १७ वर्षाखालील मुलींच्या गटामध्ये गोळा फेक प्रकारात पूनम पुंडगे प्रथम, तर साक्षी दुगाने द्वितीय, थाळी फेक प्रकारात पूनम पुंडगे प्रथम, साक्षी दुगाने तृतीय, तीन किलोमीटर चालणे स्पर्धेत सुमन पवार प्रथम क्रमांक पटकावून शाळेचा व गावाचा नावलौकिक संपूर्ण तालुक्यामध्ये केला. या सर्व खेळाडूंना शाळेची क्रीडा शिक्षक शेख मुजीब यांचे मार्गदर्शन लाभले.
खेळाडूंच्या या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक तुकाराम साळुंके,माजी जिल्हा परिषद सदस्य माणिक अप्पा घुंबरे, वाघाळाचे सरपंच बंटी पाटील घुंबरे,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुशील घुंबरे, उमाशंकर स्वामी,सुमित लांडे, शंकर धावरे, संदीप सूत्रावे, अरविंद जाधव, श्रीनिवास कासले,सचिन वाघ, सुनयना चव्हाण, स्नेहल मॅडम, प्रदीप खाजेकर,ज्योती गोरे,सुशीला किरवलेआदींनी अभिनंदन करून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close