नेहरू विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय शेगाव (बूज) येथे आपत्ती व्यवस्थापन समिती गठित
तालुका प्रतिनिधी:ग्यानीवंत गेडाम वरोरा
शाळा सुरक्षा कार्यक्रम अंतर्गत शालेय आपत्ती व्यवस्थापन संदर्भात सह विचार सभेचे आयोजन नेहरू विद्यालय शेगाव बूज येथे करण्यात आले. आपत्ती व्यवस्थापन नोडल शिक्षक नरेन्द्र गुरुदास कन्नाके सर यांनी पुणे झालेल्या प्रशिक्षणाची सर्व माहिती सविस्तपणे सांगितली. त्या अनुषंगाने शाळेत असलेले धोके व आपत्ती यावर उपस्थित असलेले ज्ञानेश्वर चहारे (गटशिक्षाधिकारी) वरोरा,सिद्धार्थ पाटील(सरपंच) शेगाव बूज,डॉ. नितीन चौधरी,(आरोग्य अधिकारी) प्रा.आ.केंद्र सावरी,किशोर पिरके(उपनिरीक्षक) पोलीस स्टेशन शेगाव बूज, नामदेव राउत (शिक्षण विस्तार अधिकारी) शेगाव बूज,भूषण सालवटकर (स्वच्छता निरीक्षक ) न.प.वरोरा, वैभव जुमडे(सहा. अभियंता) उपवीज केंद्र शेगांव बूज, स्नेहा रोहनकर (पटवारी) शेगाव बूज तर सभेचे अध्यक्ष मा.बालाजी ढाकुणकर (मुख्याध्यापक) नेहरू विद्यालय शेगाव बूज या सर्व अधिकारी मान्यवरांनी आपापले मत व्यक्त केले. इतर शालेय समिती प्रमाणे आपत्ती व्यवस्थापन समिती अतिशय महत्वाची आहे. यामुळे धोके टाळून होणारी आपत्ती सहज वाचविता येऊ शकते. या समिती मधे अध्यक्ष म्हणून बालाजी ढाकूनकर (मुख्याध्यापक) तर बाकी सर्व वेगवेगळ्या विभागाचे अधिकारी सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले.शाळेतील संभाव्य धोके व होणारी आपत्ती यावर संपूर्ण लक्ष आपत्ती व्यवस्थापन समिती चे राहणार आहे.सर्वांचे आभार मानून सभेची सांगता करण्यात आली.