ताज्या घडामोडी

राज्यमंत्री ना.बच्चुभाऊ कडु यांचा दोन दिवसीय चंद्रपुर-गडचिरोली जिल्हा दौरा

प्रतिनिधी:रामचंद्र कामडी

महाराष्ट्राचे लाडके लोकनेते राज्यमंत्री मा.ना.बच्चुभाऊ कडु यांचा 17 व 18 मे रोजी दोन दिवसीय चंद्रपुर-गडचिरोली जिल्हा दौरा होनार असून अनेक ठिकाणी भेटी देणार आहेत तसेच जिल्ह्यातील अनेक समस्यांना जाणून घेऊन शासनदरबारी समस्या सोडविण्यावर भर देणार आहेत आणि विविध कार्यक्रमांना भेटी देणार आहेत यामुळे प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे चंद्रपुर-गडचिरोली जिल्ह्यातुन कामगारांच्या वाढत्या समस्या लक्षात घेत कामगारांच्या आग्रहास्तव राज्यमंत्री बच्चुभाऊ कडु हे चंद्रपुर-गडचिरोली दौऱ्यावर येत आहेत.या दौऱ्यात त्यांचा 17 व 18 मे रोजीचे नियमीत नियोजीत कार्यक्रम
17 मेला राजुरा येथे आगमन होणार आहे त्यानंतर पाटण तालुका जिवती येथे जाणार आहेत लगेच सांस्कृतिक कार्यक्रम मध्ये उपस्थिती दर्शविणार आहेत त्यानंतर दि 18 मे ला सकाळी कोलाम गुडयाशी चर्चा करून गडचिरोली ला प्रयाण करून दुपारपर्यंत तेथिल कार्यक्रम आटपून दुपारी दोन वाजता चंद्रपूर ला आगमन होणार आहे तीन वाजता तिरंगा रॅलीच्या कार्यक्रमात सहभाग घेणार आहेत दुपारी 4 वाजता कामगार आनंद मेळाव्यास उपस्थिती दर्शवून कामगारांच्या व्यथा समजून मार्गदर्शन करणार आहेत
या कामगार आनंद मेळाव्यास कामगारांनी व नागरिकांनी प्रहार संघटनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने ऊपस्थित राहण्याचे आव्हाण शहर, ग्रामीण, तालुका प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतिने करन्यात आले आहे .

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close