गडचिरोली जिल्ह्यात भूकंप. ??
प्राणहिता नदी काठावरील सिरोंचासह ,अहेरी ,आष्टी, जवळ भूकंपाचे झटके .
जिल्हाधिकारी संजय मीणा यांची माहिती.
प्रतिनिधी : चक्रधर मेश्राम
दि. 31/10/2021:-
गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या सिरोंचा तालुक्यातील काही ठिकाणी सौम्य भूकंप झाला असून या बाबत कुणीही भितीचे वातावरण पसरवू नये. असे आवाहन गडचिरोली जिह्ल्याचे जिल्हाधिकारी यांनी केले आहे. झालेल्या भूकंपाचे
स्रोत: नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी, GOI. 77 किमी खोलीसह 4.3 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. अक्षांश 19.00 आणि रेखांश 79.96, अहवाल वेळ 18:48:47 (IST). सदर भुकंप हा गडचिरोली आणि तेलंगणा सीमेवर जाफ्राबाद चकजवळ (प्राणहिता नदीजवळ), सिरोंचा तालुका-अक्षांश आणि रेखांशानुसार केंद्राची नोंद करण्यात आलेली आहे. पुढे होणाऱ्या अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे. कृपया कोणतीही दहशत आणि भीती निर्माण करणारे संदेश पसरवू नयेत. या भुकंपमुळे आत्तापर्यंत कोणतीही मानवी किंवा मालाची हानी झाल्याचे वृत्त नाही. संबंधित विभागांकडून माहिती प्राप्त होताच अधिकृत अहवाल दिला जाईल. हा भूकंप आज दिनांक : 31 ऑक्टोबर, 2021 रोजी झाला असून भूकंपाची वेळ : सायंकाळी 6.48 वाजता ही आहे.
अक्षांश रेखांश : 19.00, 79.96
महत्ता रिष्टर : 4.3
धक्क्याचे स्वरूप – सौम्य होते.
भूकंप जाणवलेली ठिकाणे :
गडचिरोली आणि तेलंगाणा सीमेवरील जाफराबाद चाक (प्राणहिता नदी) ता. सिरोंचा तसेच अहेरी, आष्टी या भागात सुद्धा हलके-मध्यम स्वरूपाचे भूकंपाचे झटके जाणवल्याची प्राथमिक माहिती आहे.
केंद्रबिंदूची खोली : 77 किमी.
नुकसान : सद्यपरिस्थितीत कुठल्याही नुकसानीची नोंद नाही. परिस्थिती नियंत्रणात आहे. गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी माहिती दिली आहे