जिमलगट्टा येथे महाराजस्व अभियान संपन्न

तालुका प्रतिनिधी : विस्तारी गंगाधरीवार अहेरी
मो.9284056307
विविध प्रमानपत्रांचे वाटप
अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा येथे अहेरी तहसील कार्यालयामार्फत महाराजस्व अभियान कार्यक्रम घेण्यात आले.या अभियानाचे अध्यक्ष नायब तहसीलदार डी बी खोत तर,प्रमुख अतिथी म्हणून माजी जि प अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम आणि प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच पंकज तलांडे,उमानूरचे सरपंच श्रीनिवास गावडे,मरपल्ली चे सरपंच अरुण वेलादी,जिमलगट्टा चे उपसरपंच वेंकटेश मेडी आदी मान्यवर उपस्थित होते.
महाराजस्व अभियानात विविध विभागाकडून स्टॉल लावून विविध योजनांची माहिती देण्यात आली.दुर्गम भागातील नागरिकांना वेळोवेळी कार्यालय गाठून आपले कामे करून घेणं शक्य नसल्याने विविध ठिकाणी महाराजस्व अभियान घेण्यात येत आहे.शासन आपल्या दारापर्यंत येत असून जिमलगट्टा परिसरातील नागरिकांनी विविध योजनांबाबत माहिती जाणून घेऊन प्रत्येक योजनेचा लाभ घ्यावा असे भाग्यश्री ताई आत्राम यांनी आपल्या मार्गदर्शनात आवाहन केले.
या अभियानात महसूल विभागामार्फत लाभार्थ्यांना जातीचे दाखले,रेशनकार्ड, सातबारा आदी प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.महाराजस्व अभियानात जिमलगट्टा परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळ अधिकारी आर पी सिडाम यांनी केले.तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व विभागातील कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.