ताज्या घडामोडी

बंदी असताना गणपती विसर्जन मिरवणूक काढल्यामुळे कार्यकर्त्या विरुद्ध गुन्हे दाखल

प्रतिनिधी: संजय नागदेवे तिरोडा

महाराष्ट्र शासन गृह विभाग मंत्रालय मुबंई यांचे परिपत्रक नुसार कोविड -19 मुळे उध्दभवलेल्या संसर्गजन्य परिस्थिती चा विचार करता या वर्षी गणेशेत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. मार्गदर्शक सूचना नुसार श्रीच्या आगमन व विसर्जन मिरवणू का काढण्यात येऊ नयेत असे सप्ष्ट नमुद करण्यात आलेले आहे.या बाबत सर्व गणपती मंडळ यांना परवानगी देते वेळी आणि गणपती मंडळ च्या बैठक च्या वेळी सुस्पष्ट माहिती देण्यात आलेली आहे. त्याच प्रमाणे सरपंच मुंडीकोटा यांनी ना हरकत प्रमाणपत्र मध्ये सुद्धा वरील शासन परिपत्रकनुसार विसर्जन मिरवणूक काढण्यात येऊ नये असे नमुद केलेले आहे. तरी पण आज दिनांक 19/09/21 रोजी 17/45 वाजता नवयुवक गणेश मंडळ मुंडीकोटा यांनी गणपती विसर्जन मिरवणूक ला बंदी असतानी सुद्धा मा सरस्वती दिलवर ग्रुप डी जे धमाल यांची धुमाल, यांचे साउंड मोठया गाडी वर लावून गणपती चे गाणे वाजवीत, मध्ये बँड वाजवून मोहल्ल्यातील पुरुष, महिला नाचत गुलाल एकमेकांना लावीत मिरवणूक काढली काढलेली आहे. वरील शासन परिपत्रक चे उलंघन केल्यामुळे गणपती मंडळ च्या खालील कार्यकर्ते यांचे विरुद्ध पो शी इरफान शेख यांचे तक्रारी वरून कलम 188, 269भादवि सह कलम 51(ब )राष्टीय आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005, सह कलम 11 महाराष्ट्र कोविड अधिनियम 2020, सह कलम 2, 3
(1) प्रमोद काळसरपे अध्यक्ष
(2)सोमेश राऊत उपाध्यक्ष
(3)शीवकुमार राऊत सचिव
(4) बुद्धघोष बोम्बार्डे कोषाध्यक्ष
(5)मंगेश राऊत सदस्य
(6)निकेश नीलगाये सदस्य
(7) अक्षय राऊत सदस्य
(8) मा सरस्वती दिलवर रूप डी जे धुमाल पार्टी पांजरा देवाडा तुमसर जिल्हा भंडारा. चा मालक.
(9) टाटा एस 207 डी आय गाडी क्रमांक MH 36/ AA 1324 चा मालक चालक. गुन्ह्यांचा पुढील तपास पो हवा शंकर साठवणे करीत आहेत.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close