ताज्या घडामोडी
जित कुने दो क्रिडा प्रकारात शिवाजी पब्लीक स्कूल चे दोन विद्यार्थी विदर्भात प्रथम
मुख्य संपादक :कु.समिधा भैसारे
शालेय विदर्भ स्तरीय क्रिडा स्पर्धेत शिवाजी पब्लीक स्कुल व ज्युनियर कॉलेज भिसी येथील वर्ग 8 चे विद्यार्थी कोमल चंद्रशेखर लोहकरे व वेदांत मनोज गलगले जित कुने दो या क्रीडा प्रकारात 14 वर्षा आतील गटात विदर्भात प्रथम क्रमांक पटकवीला आहे
त्यांची निवड राज्य जित कुने दो स्पर्ध्येसाठी झाली असुन चिमुर तालुक्यातील दोन्ही विद्यार्थी प्रथम राज्यस्तरावर जाणारे आहे तिला त्यांना या यशा बद्दल शाळेचे अध्यक्ष नितेश उघडे , मुख्याध्यापक अविनाश बोरकर व शाळेतील शिक्षक व शिक्षिका यानी अभिनंदन केले व पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या कोमलने व वेदांत ने आपल्या यशाचे श्रेय प्रशिक्षक शिफु डॉ. सुशांत के. इन्दोरकर व आपल्या आई वडलांना दिले चिमुर तालुक्यात त्यांच्या यशाचे कौतुक सर्वत्र होत आहे .