नेरी बँक ऑफ इंडिया समोर प्रहार चे लोटांगण आंदोलन यशस्वी
सर्व मागण्या मंजूर करून अंमलबजावणी करण्याचे दिले पत्र.
ग्रामीण प्रतिनिधी:रामचंद्र कामडी नेरी
नेरी हे तालुक्यातील सर्वात मोठे गाव असून इथे एकच राष्ट्रीय कृत बँक आहे परंतु ही बँक शाखा समस्या च्या विळख्यात सापडली असताना प्रहार जनशक्ती पक्ष व चालकमालक संघटना यांनी बँकेच्या ग्राहकांच्या समस्या सोडविण्यासाठी आज दि 7 मार्चला बँकेच्या ग्राहकांना सोबत घेऊन लोटांगण आंदोलन दुपारी 12 वाजता केले सदर आंदोलन माननीय राज्यमंत्री बचू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली प्रहरसेवक शेरखान पठाण प्रहार सेवक ऋषी कुवर आणि प्रहार सेवक प्रवीण वाघे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला सर्वात प्रथम छत्रपती शिवाजी महाराज आणि डाँ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करून आंदोलनाला सुरवात करण्यात आली प्रमुख मागण्यांना घेऊन मान्यवरांनी मार्गदर्शन केले आणि जय प्रहार च्या घोषणाबाजी करीत आंदोलनाला सुरवात करण्यात आली तेव्हा बँक शाखेने ह्या सर्व मागण्या मंजूर करीत तात्काळ अंमलबजावणी करण्याचे पत्र देताच आंदोलन माघे घेण्यात आले यात प्रमुख मागण्या मान्य करण्यात आल्या विद्यार्थ्याचे बँक खाते उघडण्यात आलेले आहेत उर्वरित त्वरित उघडण्यात येईल . . शाखेमध्ये ग्राहकांसाठी मंडास बाथरुमची व्यवस्था करण्यात येईल खाते धारकांना वाहन पार्किंग उपलब्ध करून देण्यात येईल मुबलक जागा आहे .बँकमध्ये कॅश काऊंटर महिला व पुरुष यांचे वेगवेगळे गर्दी पाहून ठेवण्यात येईल बँक शाखेत वेळोवेळी ट्रेनजेक्शन करण्यात येईल गेटवर शेक्युरिटी गार्ड संवेदनशीलता पाहून नेमण्यात येईल बँक शाखेच्या ए टी एम सुरू करण्यात येईल ग्राहकांना कॅश रकम पुरविण्यात येईल या व्यतिरिक्त अनेक मागण्या मंजूर करण्यात येईल असे पत्र देताच आंदोलन चा समारोप करण्यात आला यावेळी प्रहारसेवक शेरखान पठाण प्रहारसेवक ऋषी कुंवर प्रहार सेवक प्रवीण वाघे अशिद मेश्राम, विनोद उमरे,अक्षय कामडी, हर्जीतसिंग भोंड,देवा गिरडे, सचिन वाघे, दिलीप वाघे, देवानंद पिसे, प्रविण बोरसरे, सुमीत दंदारे, देविदास सहारे,राजु राजणहिरे, भुषण चाफले, अविनाश कांमडी, शुभम मोरे , वैभव मोरे,आणि सर्व प्रहार संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी नागरिक ग्राहक उपस्थित होते.