बाल तरुणांना योग्य संस्कार मिळण्यासाठी सुसंस्कार शिबर घेणे काळाची गरज -डॉ. सतिशभाऊ वारजुकर

तालुका प्रतिनिधी:कल्यानी मुनघाटे नागभीड
श्रीगुरुदेव राष्ट्रधर्म प्रचार समिती राष्ट्रसंत अध्यात्म केंद्र गुरुकुंज मोजरी तथा श्री. संत एकनाथ महाराज संस्थान,श्रीगुरुदेव सेवा मंडळ, कोलारी यांच्या सयुक्त विद्यमाने श्री. गुरुदेव सर्वांगीण सुसंस्कार शिबीराचे आयोजन करण्यात आले या शिबिरामध्ये बाल तरुणांना जीवनाचे योग्य संस्कार मिळावे यासाठी अशा शिबिराचे आयोजन करने काळाची गरज आहे असे प्रतिपादन डॉ. सतिशभाऊ वारजुकर यांनी केले या शिबिराचा माध्यमातून बौद्धिक -धर्म -समभाव, राष्ट्रीय एकात्मता,थोर पुरुषांचे, चरित्रदर्शन, सेवावृत्ती आदर्श दिनचर्या, चरित्र संवर्धन, वक्तशीरपणा, आज्ञापालन,उठण्या बसण्याची व बोलण्याची शिस्त, व्यसन निर्मूलन स्वदेशी वस्तूबद्दल प्रेम,व्यक्तिमहत्व विकास, श्रमनिष्ठ, अंगभूत कलेचे दर्शन सामाजिक कर्तव्याची जाणीव ब, समुदाईक ध्यान प्रार्थना,आदर्श ग्रामनिर्माण तसेच प्राथमिक आयुर्वेद औषधोपचार व्यायाम -सूर्य नमस्कार योगासणे, प्राणायाम,मंल्लखांब लाठी काठी, मैदानी खेळ, मराठी हिंदी भजने, सातसंगत अशाप्रकारचे प्राथमिक शिक्षण बाल तरुणांनी घेतले दि.६/६/२०२३ ला ७४ चिमूर विधानसभा क्षेत्राचे समन्व्यक तथा उपाध्यक्ष ओबीसी महासंघ महाराष्ट्र प्रदेश डॉ. सतिशभाऊ वारजुकर यांनी कोलारी येथे जाऊन मार्गदर्शन केले व अल्पोहारा करिता १० हजार रुपयांची मदत दिली या वेळी, तालुका कांग्रेस कमिटी चिमूर अध्यक्ष डॉ. विजयजी गावंडे,चिंतेश्वरजी चौधरी.किशोर गावंडे, बळीजी गावंडे, दत्तूजी कडू,व बाल तरुण मंडळी उपस्थित होते .