ताज्या घडामोडी

चिमूर तालुक्यात म्हसली येथे कोरोना लोक जागृती कार्यक्रम संपन्न

तालुका प्रतिनिधी : मंगेश शेंडे चिमुर

संपूर्ण जगात भयावह परिस्थिती कोरोना महामारी राक्षशी संकट पसरले आहे संपूर्ण जग सध्यास्थितीत भीतीच्या वातावरनात आहे. कुणाचे रोजगार तर विध्यार्थी यांचे शिक्षण कुणाचे पुर्णच्या पुर्ण कुटुंब उध्वस्थ झालेले आपण आपल्या डोळ्यानी पाहले आहोत भयानक परिस्थिती असताना सुद्धा लसीकरणा विषयी भीतीचे वातावरण व अफवा पसरल्या आहेत या गैरसमजुती मुळे नागरिकांची पाठ लसीकरणा कडे आपल्याला पाहायला मिळत आहे. नागरिकांच्या मनातील भीतीचे वातावरण दूर करण्यासाठी चिमुर तालुक्यातील म्हसली या गावामध्ये लोक जागृती कार्यक्रम घेण्यात आला चिमूर तालुका पंचायत समिती येथिल नव्याने रुजू झालेले गटविकास अधिकारी साळवे साहेब जिल्हा परिषद यांचे कल्पकतेतुन व त्यांच्या मार्गदर्शनातुन तालुक्यातील प्रत्येक गावात पठनाट्य द्वारे जनजागृती उपक्रम हाती घेतला आहे लसीकरण जनजागृती मोहिमेचा प्रत्येक गावा गावातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. लोक स्वतःहून लसीकरनास प्रवृत्त होत आहे कोविड लसीकरण हे प्रत्येक मानवाला जगण्याचे बळ देणारे आहे त्या मुळे मनातील भिती ,अफवा व गैरसमज दूर करुन लसीकरन मोहीम यसश्वि होण्यास उत्तम प्रतिसाद द्यावा तथा स्वता परिवारास सुरक्षित ठेवावा असे आव्हान लोक जागृती कार्यक्रमातुन करण्यात येत आहे.
या कोरोना लसीकरन जण जागृती कार्यक्रमामध्ये उपस्थित म्हसली येथील सरपंच संकेत सोनवणे , उपसरपंच प्रमोद खोब्रागडे , सचिव गुप्ता साहेब व पद्माकर पेंदाम हे उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close