मानवत येथील अख्तर शाह खुन प्रकरण सि .आय .डी कडे तपास देण्याची मागणी

अन्यथा विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद येथे नातेवाईकांचा उपोषणाचा ईशारा

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
मानवत शहरातील तकिया मोहल्ला परिसरात राहणारे अख्त्तर शाह जलील शाह या युवकाचे दि.६ फेब्रुवारी २०२० रोजी ताडबोरगाव शिवारात निर्घुणपणे हत्या करून अर्धवट जळालेला मृतदेह आढळला होता या बाबत मानवत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असता तब्बल दोन वर्ष व्हायला आले असतानासुध्दा या खुनाचा तपास अद्याप गुलदस्त्यातच राहिला आहे या खुनाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेला ही सोपीवीण्यात आला होता स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने संशयित व्यक्ती ची चौकशी करण्यात आली मात्र त्यांच्या हाती काही लागले नाही त्यानंतर नातेवाईक च्या वतीने मानवत पोलीस स्टेशन समोर उपोषण करण्यात आले होते येथील उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी उपोषण करते चे मन परिवर्तन करून त्यांना आश्वासन दिले होते की आरोपींना लवकरात लवकर अटक करून कायदेशीर कारवाई केली जाईल मात्र अद्यापही पोलिसांना या प्रकरणाचा छडा लावण्यात यश आला नाही यामुळे मयत चे नातेवाईक व महाराष्ट्र मुस्लिम युवक प्रतिष्ठान यांच्या वतीने गुरुवारी २ डिसेंबर रोजी विशेष पोलीस महानिरीक्षक नांदेड व परभणी पोलीस अधीक्षक यांना निवेदन देऊन या खुन प्रकरणाचा तपास सि आय डी कडे देऊन गुन्हेगारांना अटक करण्याची मागणी केली आहे अन्यथा दि.१७ जानेवारी २०२२ रोजी
विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद येथे आमरण उपोषणाचा ईशारा निवेदनात देण्यात आला आहे.
या निवेदनावर मयती ची पत्नी रिजवाना अख्तर शाह, वडील जलिल शाह, भाऊ रौफ शाह,आई लतिफा जलिल शाह व महाराष्ट्र मुस्लिम प्रतिष्ठानचे तालुकाध्यक्ष जिलानी जलील शाह यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.