ताज्या घडामोडी

भारत मुक्ती मोर्चा च्या वतीने आज ‘महाराष्ट्र बंद’ ची हाक

प्रतिनिधी:-अहमद अन्सारी परभणी

भारत मुक्ती मोर्चा या राष्ट्रीय संघटनेच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष मान्यवर वामन मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी 2 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंद केला जाणार असल्याची माहिती बहुजन क्रांती मोर्चाचे तालुका संयोजक नितीन कांबळे यांनी माहिती दिली.


या मोर्चास बहुजन क्रांती मोर्चा, छत्रपती क्रांती सेना, राष्ट्रीय पिछडा वर्ग ओबीसी मोर्चा, बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क, सत्यशोधक मूलनिवासी वारकरी महासंघ, मौर्य क्रांती संघ, लहुजी क्रांती मोर्चा, अखिल भारतीय कैकाडी महासंघ आदी समविचारी संघटनांनी पाठिंबा दर्शविला आहे. नितीन कांबळे यांनी अधिक माहिती देताना सांगितले की गृहमंत्री फडणवीसांच्या आदेशावरून मराठा आंदोलकावर केलेल्या अमानुष लाठी हल्ला व गोळीबाराच्या विरोधात, महाराष्ट्र राज्याच्या ६२ हजार सरकारी शाळांचे खाजगीकरणाच्या संविधान विरोधी व बहुजन विरोधी आरएसएस व भाजप सरकारच्या धोरणाच्या विरोधात, शिव-फुले-शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र वेठ बिगारांचा महाराष्ट्र करणाऱ्या आरएसएस भाजप सरकारच्या धोरणा विरोधात, ओबीसींची जातनिहाय जनगणना करणे व संविधानिक हक्क अधिकाऱ्यांच्या समर्थनात, बहुजनांचे प्रेरणास्थळ पंढरपूरचे पांडुरंगाचे मंदिर बडव्यांच्या स्वाधीन करण्याच्या आरएसएस भाजपाच्या षडयंत्राच्या विरोधात, बहुजन महापुरुषांचा संविधान व राष्ट्रप्रतीकांचा अपमान करणाऱ्या देशद्रोही दंगलखोर मनोहर भिडेला अभय देणाऱ्या भाजप सरकारच्या विरोधात, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवत संवैधानिक व शांततेच्या मार्गाने महाराष्ट्र बंद करण्यात येणार आहे.तसेच पाथरी शहरातील मार्केटमध्ये बहुजन क्रांती मोर्चा व विविध सामाजिक संघटनेच्या वतीने महाराष्ट्र बंदचे पत्रक वाटून या बंदला सर्वांनी समर्थन द्यावे अशी विनंती बहुजन क्रांती मोर्चाचे पाथरी तालुका संयोजक नितीन कांबळे यांनी केली आहे. यावेळी संजय सोनकांबळे तालुका संयोजक बहुजन क्रांती मोर्चा मानवत, शामभाऊ कांबळे, समाधान गवारे, विनोद जाधव, सचिन कांबळे, माधव कदम, सुरज कांबळे, करण कांबळे, महादेव चव्हाण, थोरे,टेकुळे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close